Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

IMDb २०२४ च्या यादीत दिशा पटानीचा तिहेरी विजय

IMDb २०२४ च्या यादीत दिशा पटानीचा तिहेरी विजय IMDb (www.imdb.com), ह्या मूव्हीज, टीव्ही‌ आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने नुकतंच 2024 च्या सर्वांत लोकप्रिय (आजवरच्या) व उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांच्या नावांची घोषणा केली. काय शोधावे व काय बघावे, ह्यासाठी IMDb वर येणार्‍या जगभरातील IMDb च्या दर महिन्यामधील 25 कोटींहून अधिक विझिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजवर ह्या याद्या आधारित आहेत. 2024 च्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपटांमध्ये (आतापर्यंत), दिशा पटानीने कल्की 2898 AD या चित्रपटात भूमिका साकारली आहे, जो चित्रपट या यादीत यादीत आघाडीवर आहे. पुढे पाहता, बाकीच्या वर्षातील सर्वाधिक अपेक्षित भारतीय चित्रपटांमध्ये पटानीची उपस्थिती आहे. तिच्या आगामी प्रकल्पांमध्ये या यादीत 3 क्रमांकावर वेलकम टू द जंगल आणि 5 क्रमांकावर कांगुवा यांचा समावेश आहे. अभिनेत्री दिशा पटानी म्हणाली की, "आयएमडीबीच्या लिस्टमध्ये माझे चित्रपट पाहून मला खरंच खूप आनंद झाला आहे. कल्की 2898 एडी, वेलकम टू द जंगल, आणि कांगुवा या चित्रपटांमध्ये काम करणे हा एक अविस्मरणीय प्रवास आहे. कल्की 2898 एडी साठी जगभरातील चाहत्यांकडून मिळालेले प्रेम माझ्यासाठी सर्व काही आहे, आणि मी त्यांच्या या पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे. मी माझ्या आगामी प्रकल्पांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास आणि त्यांच्याशी जोडले जाण्यास उत्सुक आहे आणि मी कांगुवा आणि वेलकम टू द जंगलच्या रिलीजसाठी प्रेक्षकांइतकीच उत्सुक आहे."
2024 मधील सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट (आत्तापर्यंतचे) 1. कल्की 2898 - एडी 2. मंजुमेल बॉयज 3. फायटर 4. हनुमान 5. शैतान 6. लापता लेडीज 7. आर्टीकल 370 8. प्रेमालू 9. आवेशम 10. मुंज्या भारतामध्ये 1 जानेवारी 2024 ते 10 जुलै 2024 पर्यंत रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांमधील हे असे असे चित्रपट आहेत ज्यांना किमान 10,000 व्होटस मिळाले आहेत व ज्यांचे IMDb युजर रेटींग 6 किंवा त्याहून अधिक आहे आणि ही शीर्षके IMDb ग्राहकांसाठी सातत्याने लोकप्रिय होती व जगभरात IMDb वर असलेल्या 25 कोटी मासिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार ही शीर्षके प्रसिद्ध ठरली आहेत. उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट 1. पुष्पा: द रूल- पार्ट 2 2. देवारा पार्ट 1 3. वेलकम टू द जंगल 4. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल‌ टाईम 5. कंगुवा 6. सिंघम अगेन 7. भूल भुलैया 3 8. थंगालन 9. औरों में कहा दम था 10. स्त्री 2 उरलेल्या वर्षामध्ये रिलीज होण्याचे नियोजन असलेल्या भारतीय चित्रपटांमध्ये, ही शीर्षके 1 जानेवारी 2024 ते 10 जुलै 2024 मध्ये सातत्याने IMDb ग्राहकांमध्ये लोकप्रिय होती व जगभरात IMDb वर असलेल्या कोट्यवधी मासिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित झाले. 2024 मधील (आत्तापर्यंतच्या) सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ पाहा व पूर्ण यादी इथे वाचा उरलेल्या वर्षामधील सर्वांत बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ पाहा व पूर्ण यादी इथे वाचा. IMDb ग्राहक ह्या व लक्षावधी अन्य प्रसिद्ध चित्रपट व वेब सिरीजना त्यांच्या व्यक्तिगत वॉचलिस्टमध्ये https://www.imdb.com/watchlist इथे जोडू शकतात. ते काय बघत आहेत, ह्यावर ट्रॅक करण्यासाठी IMDb वॉचलिस्टच्या फीचरमुळे ग्राहक सहजपणे त्यांना ज्या बघायच्या आहेत त्या मूव्हीज व वेब सिरीजची एक व्यक्तिगत यादी सहजपणे तयार करू शकतात. ग्राहक त्यांच्या वॉचलिस्टला IMDb रेटिंग, प्रसिद्धी व इतर प्रकारे सॉर्टही करू शकतात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.