Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

क्रिती सेननने द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाच्‍या प्रीमियम अलिबाग प्रकल्‍पामध्ये केली गुंतवणूक

क्रिती सेननने द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाच्‍या प्रीमियम अलिबाग प्रकल्‍पामध्ये केली गुंतवणूक प्रख्‍यात बॉलिवुड स्‍टार अभिनेत्री क्रिती सेननने द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (एचओएबीएल) सोबत पहिल्‍यांदा गुंतवणूक केली आहे, जेथे त्‍यांचा प्रीमियम अलिबाग प्रकल्‍प सोल डी अलिबाग मध्‍ये २००० चौरस फूट जमिन संपादित केली आहे. तिने केलेली गुंतवणूक उच्‍चभ्रू जमीन गुंतवणूकांसाठी एचओएबीएलचे पसंतीचे गंतव्‍य म्‍हणून स्‍थान अधिक दृढ करते, जेथे ते भारतातील लक्‍झरी राहणीमान आणि विशेष जमीन मालकीहक्‍काला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहेत.
मांडवा जेट्टीपासून अवघ्‍या २० मिनिटांच्‍या अंतरावर आणि दक्षिण मुंबईपासून समुद्रामार्गे फक्‍त ६० मिनिटांच्‍या अंतरावर असलेला हा प्रकल्‍प अलिबागच्‍या नयनरम्‍य शहरामध्‍ये वसलेला आहे. नुकतेच उदघाटन करण्‍यात आलेल्‍या एमटीएचएल कनेक्‍टीव्‍हीटीने सोयीसुविधेमध्‍ये अधिक वाढ केली आहे, ज्‍यामुळे हा प्रकल्‍प अलिबागच्‍या रिअल इस्‍टेट लँडस्‍केपमध्‍ये अत्‍याधुनिक सुविधांचा शोध घेत असलेल्‍यांसाठी अधिक आकर्षक पर्याय बनला आहे. द हाऊस ऑफ अभिनंदन लोढासह आपल्‍या पहिल्‍या गुंतवणूकीबाबत मत व्‍यक्‍त करत क्रिती सेनन म्‍हणाल्‍या, “मी आता द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचा सुरेख विकास सोल डी अलिबाग येथे अभिमानी आणि आनंदी जमीनमालक आहे. स्‍वत:हून जमिन खरेदी केल्‍याने मला सक्षम झाल्‍यासारखे वाटत आहे आणि मी काही काळापासून अलिबागमध्‍ये जागा घेण्‍याचा विचार करत होते. शांतमय, एकांत असा छान अनुभव मिळेल अशा जागेचा शोध घेण्‍यासोबत मोठी गुंतवणूक करण्‍याबाबत माझे मत स्‍पष्‍ट होते. अलिबागमधील हे प्रमुख ठिकाण मांडवा जेट्टीपासून २० मिनिटांच्‍या अंतरावर आहे, ज्‍यामुळे हा प्रकल्‍प माझ्या सर्व इच्‍छांची पूर्तता करणारा आहे. कौतुकास्‍पद बाब म्‍हणजे एचओएबीएलने माझ्यासाठी जमीन खरेदी करण्‍याची प्रक्रिया अगदी सोपी केली. आजच अलिबागमध्‍ये गुंतवणूक करण्‍यासाठी यापेक्षा अधिक उत्तम वेळ असू शकत नाही.'' नुकतेच, श्री. अमिताभ बच्‍चन यांनी देखील अलिबागमधील याच प्रकल्‍पामध्‍ये १०,००० चौरस फूटांचा भूखंड घेतला. या वर्षाच्‍या सुरूवातीला त्‍यांनी अयोध्‍यामध्‍ये द सरायूसाठी एचओएबीएलसोबत पहिल्‍यांदा गुंतवणूक केली, जेथे त्‍यांनी १०,००० चौरस फूटांचा भूखंड खरेदी केला. क्रिती सेनन गुंतवणूकदारांच्‍या प्रतिष्ठित श्रेणीत सामील होण्‍यासह द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाने भारतातील आलिशाान व विशेष जमीन मालकीहक्‍कासाठी प्रमुख पर्याय म्‍हणून आपली प्रतिष्‍ठा दृढ केली आहे.
भारतातील सर्वात मोठे ब्रँडेड लँड डेव्‍हलपर एचओएबीएल सोल डी अलिबागसह नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करत आहे, जे आकर्षक डिझाइन, हिरवेगार परिसर आणि उच्‍च-स्‍तरीय सुविधांचे खरे प्रतीक आहे. एमएमआरच्‍या प्रसिद्ध राजधानीमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या स्थित हा प्रकल्‍प बारकाईने नियोजित केलेले एन्‍क्‍लेव्‍ह देतो, ज्‍यामध्‍ये आधुनिक पायाभूत सुविधांसह नैसर्गिक सौंदर्याचे उत्तम संयोजन आहे. निसर्गरम्‍य सौंदर्य आणि मुंबईपासून जवळच्‍या अंतरावर असलेले अलिबाग जमीन व मालमत्ता गुंतणूकांसाठी प्रमुख गंतव्‍य बनले आहे. मुंबई व अलिबागदरमयान कनेक्‍टीव्‍हीटी वाढवण्‍यासाठी राबवण्‍यात येत असलेले सरकारी उपक्रम रिअल इस्‍टेट विकासाला चालना देत आहेत, तसेच विकासक, गृहखरेदीदार आणि गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. विस्‍तारित रस्‍ते, सुधारित परिवहन सुविधा आणि नवीन विमानतळ अशा सुधारित पायाभूत सुविधांमुळे सोयीसुविधांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामत: लक्‍झरी सेकंड होम्‍ससाठी मागणी वाढली आहे. मुंबई ट्रान्‍स हार्बर लिंक (एमटीएचएल) यासारखे मोठे प्रकल्‍प रूचीमध्‍ये वाढ करत आहे. वाढते मालमत्ता मूल्‍य आणि सुधारित सोयीसुविधांसह अलिबाग पुढील दशकात प्रमुख निवासी क्षेत्र म्‍हणून उदयास येण्‍यास सज्‍ज आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.