Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अभिनेता अमेय वाघचे डिजिटल युगात आणखी एक पाऊल*

*अभिनेता अमेय वाघचे डिजिटल युगात आणखी एक पाऊल* *अभिनेता अमेय वाघचे स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले* मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ ओळखला जातो. काला पानी, असूर यांसारख्या हिंदी वेबसीरिज, दिल दोस्ती दुनियादारी सारखी लोकप्रिय मालिका आणि फास्टर फेणे, मुरांबा, धुरळा यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून अमेयने आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही अमेयचे अनेक प्रोजेक्ट्स लाईन अप आहेत. त्याबद्दल अमेय सोशल मिडियावर चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असतो. आता अमेय त्याच्या चाहत्यांसाठी एक भन्नाट बातमी घेऊन आला आहे. 'ती' म्हणजे अमेयने डिजिटल युगात आणखी एक पाऊल टाकले आहे.
अमेयने चाहत्यांशी दिल से कनेक्ट होता यावे म्हणून स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले आहे. असे करणारा मराठी सिनेसृष्टीतील अमेय वाघ हा पहिलाच कलाकार ठरला आहे. त्यामुळे इथून पुढे चाहत्यांना अमेयचे आगामी प्रोजेक्ट्स आणि प्रदर्शनाच्या तारखा आता एका क्लिकवर समजणार आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अमेय झोन (AmeyZone) हे व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करु शकता. तेव्हा आजच व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करा आणि वाघ सेनेत सामील व्हा! Link https://whatsapp.com/channel/0029Vaf30XYLo4hlgb2g161x

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.