सप्तसूर म्युझिकतर्फे 'मन विठ्ठल विठ्ठल गाई' म्युझिक व्हिडिओ लाँच
July 13, 2024
0
बालगायक जयेश खरे च्या आवाजातील "मन विठ्ठल विठ्ठल गाई'
"मन विठ्ठल विठ्ठल गाई' गाण्यात चमकला बालकलाकार साईराज केंद्रे
आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस घेऊन लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. अवघा महाराष्ट्र विठूनामामध्ये दंग झालेला आहे. या निमित्ताने सप्तसूर म्युझिकतर्फे मन विठ्ठल विठ्ठल गाई' हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. बालगायक जयेश खरेने हे गाणं गायलं असून, बालकलाकार साईराज केंद्रे या म्युझिक व्हिडिओमध्ये चमकला आहे.
सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी 'मन विठ्ठल विठ्ठल गाई' या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन नवनाथ निकम यांनी, राज रणदिवे यांनी गीतलेखन, विशाल - समाधान यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये साईराज केंद्रे, पियुषा पाटील, सुहास जाधव, कोंडू तात्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कैलाश पवार यांनी छायांकन केलं आहे. आषाढी एकादशी हा केवळ पंढरपूरचाच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचा सोहळा असतो, भक्तीचा उत्सव असतो.
सप्तसूर म्युझिकचा प्रत्येक म्युझिक व्हिडिओ खास असतो. त्याप्रमाणेच आषाढी वारीच्या औचित्याने 'मन विठ्ठल विठ्ठल गाई' हा म्युझिक व्हिडिओ वेगळा आहे. या म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून एका मुलाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. घरी बसून विठ्ठलाची मूर्ती तयार करत बसलेला मुलगा दिंडीसमवेत पंढरपुरात पोहोचतो आणि काय होतं हे अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या निमित्ताने विठूनामामध्ये तल्लीन होताना 'मन विठ्ठल विठ्ठल गाई' हा म्युझिक व्हिडिओ आवर्जून अनुभववा असाच आहे.
Song Link
https://youtu.be/M6oxr2djXl0?si=n-G_9zoEcagH-wNt