Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत सुरु झालीय लगीनघाई

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत सुरु झालीय लगीनघाई बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीने घेतला लग्न करण्याचा निर्णय
स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे. नात्यांची हळुवार गोष्ट उलगडणाऱ्या या लोकप्रिय मालिकेत मानसीच्या लग्नाची लगबग सुरु झालीय. खरतर आपल्या मुलीने शिकून स्वावलंबी व्हावं, तिचं चांगल्या घरात लग्न व्हावं हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. मानसीच्या बाबांनीही आपल्या मुलींसाठी खूप स्वप्न पाहिली आहेत. वीट भट्टीतला कामगार ते वीटभट्टीचा मालक हा संघर्ष मानसीच्या बाबांनी अनुभवला आहे. त्यामुळे आपण जे भोगलं ते आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये असं त्यांना वाटतं. म्हणूनच आपल्यापेक्षाही श्रीमंत असलेलं खानदानी स्थळ त्यांनी मानसीसाठी शोधलं आहे. आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी रणजीतसोबत लग्न करण्यास तयार झालीय.
मानसीने आजवर स्वत:च्या आनंदाचा कधीही विचार केला नाही. इतरांच्या आनंदासाठी आपण मन मारुन जगतोय हेही तिच्या लक्षात येत नाही. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हेचं मानसीचं ध्येय आहे. तिने स्वत:साठी कधी स्वप्नं पाहिलंचं नाही. त्यामुळेच प्रेम काय लग्नानंतरही होईल असं तिचं मत आहे. मानसीने लग्न करण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणार आहे. कसा असेल मानसीचा यापुढील प्रवास हे जाणून घ्यायचं असेल तर पहात रहा थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.