Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पुकार – दिल से दिल तक’ मालिकेत काम करणारा अभिनेता अभिषेक निगम सांगत आहे सागर आणि वेदिका यांच्यात फुलत असलेल्या प्रेम-कहाणीविषयी

पुकार – दिल से दिल तक’ मालिकेत काम करणारा अभिनेता अभिषेक निगम सांगत आहे सागर आणि वेदिका यांच्यात फुलत असलेल्या प्रेम-कहाणीविषयी
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुकार – दिल से दिल तक’ मालिकेच्या वेधक कथानकाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या मालिकेत एका आईची आणि तिच्या दोन मुलींची गोष्ट आहे, ज्या तिघींना एका कुटिल करस्थानात एकमेकींपासून दूर करण्यात आले आहे. मात्र नियती, एका अनपेक्षित वळणावर त्यांना पुन्हा एकत्र घेऊन येते आणि विरुद्ध शक्तीच्या विरोधात त्या एकजूट होतात. सध्या सुरू असलेल्या कथानकात, आपल्या पतीच्या अपघाताच्या प्रकरणातील आरोपी ड्रायव्हर दयाल याला जामिनावर सोडवणाऱ्या वेदिका (सायली साळुंके) आणि सागर (अभिषेक निगम)ने आपल्या पाठीत खंजीर खुपसला आहे असे सरस्वतीला वाटते. दुखावलेली वेदिका सागरवर आरोप करते की, त्याने आपल्या वडिलांना नामोहरम करण्यासाठी तिचा वापर केला आणि त्यातच सरस्वतीशी असलेले तिचे नाते देखील बिघडले.
मोठा वादविवाद झाल्यानंतर वेदिकाच्या हे लक्षात येते की, गौतमच्या हत्येमध्ये काही रहस्ये दडलेली आहेत, म्हणून ती सरस्वतीला हे प्रकरण पुन्हा उघडण्याची विनंती करते. या साऱ्या प्रकारामुळे राजेश्वरी हवालदिल झाल्याचे वेदिका पाहते आणि त्यातून ती हा अर्थ काढते की, महेश्वरी कुटुंबाचा या प्रकरणाशी काही ना काही तरी संबंध आहे. सरस्वतीची काळजी घेण्यासाठी ती महेश्वरींच्या घरात राहते. सत्य शोधून काढण्यासाठी सागर आणि वेदिका एकत्र होऊन काम करू लागतात, आणि त्यांच्यात नकळत एक कोवळे नाते फुलू लागते. वेदिकाच्या लहानपणीचे एक छायाचित्र पाहून अचानक त्याच्या मनात खोलवर असलेली एक स्मृती उसळून वर येते. सागरला लक्षात येते की, वेदिका म्हणजेच त्याची प्रिय सखी जान्हवी आहे, जिचा शोध तो आजवर घेत होता. प्रोमो येथे बघा:  https://www.instagram.com/reel/C883yESKNoo/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
या आगामी ट्विस्टविषयी बोलताना सागरची भूमिका करत असलेला अभिषेक निगम म्हणाला, “सागर एक आकर्षक व्यक्तिरेखा आहे- अत्यंत सक्षम आणि धाडसी. आशा आणि चिंता यांची गुंतागुंत त्याच्या मनात आहे. शिवाय, हे पात्र आणखी एका कारणाने महत्त्वाचे आहे आणि ते कारण म्हणजे, सागरच सरस्वती, वेदिका आणि कोयल यांचा संगम घडवून आणतो. स्वतःच्याही नकळत तिघींना सत्याच्या जवळ घेऊन जातो. लंडनहून परतल्यावर सागर आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीच्या जान्हवीच्या शोधात असतो. पण ती त्याला सापडत नाही. वेदिका भेटल्यानंतर त्याला तिच्याशी जवळीक जाणवते. एक अनोळखी मुलगी आपल्याला इतकी परिचित का वाटते आहे, याचे त्याला नवल वाटते. यापुढे त्या दोघांच्यात एका रोमॅंटिक नात्याची सुरुवात होते.” तो पुढे म्हणतो, “प्रेम एक सशक्त भावना आहे, यावर माझा विश्वास आहे. सागर आणि वेदिका यांच्यातले प्रेम खूप सुंदर असणार आहे, कारण अगदी लहानपणीच या प्रेमाचे बीज त्यांच्यात रोवले गेले आहे. वेदिका ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली लहानपणीची सखी जान्हवीच आहे, हे समजल्यानंतर कथा आणखीनच रोचक वळण घेईल. या खुलाशानंतर रहस्य आणखीनच गडद होत जाईल आणि कहाणी अधिक रोमांचक!” अशाप्रकारे, न्याय मिळवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला पुन्हा भेटण्यासाठी सुरू असलेल्या एकंदर धकाधकीत प्रेमाचा अंकुर फुटणार आहे! वेदिकाला तिच्या भूतकाळाचे सत्य समजेल का? बघत रहा, ‘पुकार – दिल से दिल तक’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.