*‘बॅड न्युज’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विक्की कौशलने साधला पुणेकरांशी मराठीमध्ये संवाद*
July 06, 2024
0
*‘बॅड न्युज’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विक्की कौशलने साधला पुणेकरांशी मराठीमध्ये संवाद*
*जेव्हा विक्की कौशल पुणेकरांना विचारतो ‘कसं काय पुणेकर, लय भारी?’; ‘बॅड न्युज’ चित्रपटाच्या प्रमोशन दौ-याची सुरुवात पहिले पुणे शहरातून*
“कसं काय...कसंय, लय भारी”, असं जेव्हा विकी कौशल मराठीमध्ये बोलतो तेव्हा पुणेकरांचा प्रतिसाद किती कमाल असेल ना... नुकतंच पुणेकरांनी विकी कौशलसोबत मराठीमध्ये संवाद साधला आणि निमित्त होतं विकी कौशलच्या ‘बॅड न्युज’ या आगामी चित्रपटाचे पुण्यामध्ये प्रमोशन.
धर्मा प्रॉडक्शन्स आणि लिओ मीडिया कलेक्टिव या दोन प्रॉडक्शन कंपनीचा रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेला, आनंद तिवारी दिग्दर्शित आणि विक्की कौशल, तृप्ती डिमरी, एमी विर्क यांचा ‘बॅड न्युज’ हा हिंदी चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने आता सर्व शहरांमध्ये प्रमोशनचा दौरा सुरु होणार आहे आणि त्याची सुरुवात पुणे शहरापासून झाली. विक्की कौशल आणि एमी विर्क यांनी पुणेकरांसोबत चित्रपटाच्या प्रमोशनचा प्रवास जल्लोषात साजरा केला. फॅन्स आणि पत्रकारांसोबत विक्की कौशलने दिलखुलास गप्पा मारताना म्हटले की, “पुण्यात आल्यावर त्याला नेहमी आनंद होतो, पुणेकरांकडून खूप प्रेम मिळतं, त्यामुळे पुणे शहराविषयी एक विशेष अशी ओढ वाटते आणि प्रमोशनची सुरुवात देखील पुण्यातून झाली याचा आनंद आहे.”
“आऊट एन आऊट कॉमेडी असणा-या या चित्रपटात प्रेक्षकांना अचूक कॉमेडी टायमिंग वर हसवणं हे आव्हानात्मक असतं पण काम करायला मजा येते. हा कौटुंबिक चित्रपट आहे, त्यामुळे कुटुंबासोबत तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता”, असं देखील विक्की कौशलने पत्रकारांना सांगितलं.
विक्की कौशलचा चित्रपट आला आणि त्याची जोरदार हवा...चर्चा झाली नाही असं कधीच झालं नाही. ‘हुस्न तेरा तौबा तौबा...’ या गाण्याच्या डान्स स्टेप्समुळे तर विक्की कौशलचे फॅन्स तर त्याच्यावर अजून फिदा झाले आहेत. विक्की कौशलचा पुणेकरांशी संवाद साधताना उत्साह, आनंद पुणेकरांनी अनुभवला आणि आता १९ जुलैला सर्वजण ‘बॅड न्युज’ चित्रपट पाहणार हे नक्की.