*वैजूचं लग्न रणविजयशी झालंय खरं, पण कहाणीत येणारेय नवा ट्विस्ट!*
July 21, 2024
0
*वैजूचं लग्न रणविजयशी झालंय खरं, पण कहाणीत येणारेय नवा ट्विस्ट!*
_‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेतील ऋतुजा बागवे ऊर्फ वैजू, सांगतेय याचं रहस्य!_
Promo Link:
https://youtu.be/kfTGa736rBQ?si=Y1TW8VffnwLgvq2k
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे (वैजू) आणि अंकित गुप्ता (रणविजय) मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबते, कष्ट उपसते आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी आहे आणि आपले जीवनमान उंचावणे व गावाच्या सुधारणेसाठी काम करणे, हेच तिचे ध्येय आहे.
अलीकडेच, निर्मात्यांनी या मालिकेकरता एक स्वारस्यपूर्ण प्रोमो तयार केला, ज्यात वैजूच्या भावनिक प्रवासाचे आणि प्रेमभंगाचे चित्रण करण्यात आले आहे. ज्या रणविजयवर तिचे प्रेम आहे, त्याच्याशी लग्न होऊनही ओढवलेल्या अनपेक्षित परिस्थितीमुळे वैजूला त्याच्यापासून दूर राहावे लागते. प्रोमोत तिच्या हातावर कोरलेले रणविजयचे नावदेखील दिसते, परंतु, खरोखरच तो वैजूच्या नशिबात असेल का? पुढे काय घडेल, हे पाहणे रंजक आहे!
*स्टार प्लस शो ‘माटी से बंधी डोर’मधील ऋतुजा बागवे ऊर्फ वैजूने सांगितले की,* प्रोमोमध्ये वैजूच्या भावनिक गोंधळाचे चित्रण करण्यात आले आहे, जिने रणविजयशी लग्न केले असले तरी, उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिला घर सोडावे लागते. वैजूकरता हा टप्पा कठीण होता, कारण तिने तिची तिची आई गमावली आहे, तिची बहीण कोमात आहे व ती परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. रणविजयच्या हृदयात ती आपल्याविषयी प्रेम कसे निर्माण करेल, हे बघण्यासारखे आहे. जया आणि रणविजय यांनी शेअर केलेल्या समीकरणाचे वास्तव तिच्यासमोर आल्याने वैजूने रणविजयवरील तिच्या प्रेमाचे बलिदान दिले होते, परंतु घटनांनी अनपेक्षित वळण घेतल्याने, वैजूने रणविजयशी लग्न केले. वैजू आणि रणविजय यांच्या आयुष्यात घडणाऱ्या नाट्याचे साक्षीदार होणे रंजक असेल, कारण दोघांचे लग्न हे गुपित आहे आणि जे कुणालाही ते ठाऊक नाही.”
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत वैजूच्या भावनिक उलथापालथीचे चित्रण करण्यात आले आहे, जी तिच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी संघर्ष करतेय. रणविजयशी भेट झाल्यानंतर तिच्या आयुष्यात घडणारे बदलही या मालिकेतून बघता येतील.
या मालिकेत नातेसंबंधातील गुंतागुंत आणि संस्कृतीतील विशिष्ट बारकावे यांचेही चित्रण केले जाणार आहे. उद्भवलेल्या अनपेक्षित परिस्थितीत होणारे वैजू आणि रणविजय यांचे लग्नही प्रेक्षकांना पाहता येईल. तिचे जीवनमान उंचावत आणि गावात सुधारणा घडवून आणण्याची तिची महत्त्वाकांक्षा कायम ठेवत ज्या लग्नात प्रेमाचा लवलेश नाही, त्या विवाहाच्या नात्यात वैजूला प्रेम कसे प्राप्त होते, हे पाहणे रंजक ठरेल.
‘माटी से बंधी डोर’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सोमवार ते रविवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होते.