*'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच येतेय एक 'परदेसी गर्ल'*
July 26, 2024
0
'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. आपल्या हटके फॅशनने समृद्ध करणारं तिचं व्यक्तीमत्त्व, किलर लूक आणि घायाळ करणाऱ्या अदा... आत्मविश्वाच्या जोरावर जिंकेल का मराठमोळ्या 'बिग बॉस'प्रेमींची मने? ग्लॅमरस परदेसी गर्ल 'बिग बॉस मराठी'च्या घरात कशी करतेय जगण्याची कसरत हे लवकरच पाहायला मिळेल. मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चा Grand Premiere या रविवारी 28 जुलै, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.
*येतोय सुरांचा बादशाह*
'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाचा नॉन रिव्हिल प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमोत झळकणारा हा सदस्य कोण? हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. या सुरांच्या बादशाहमुळे घरातील राधा बावऱ्या होणार आहेत. पाहा 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वाजता आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर आणि Jiocinema वर कधीही.