*'डंका' चित्रपटातील या विठ्ठलाने खऱ्या आयुष्यातही जपली माणुसकी,
July 05, 2024
0
*'डंका' चित्रपटातील या विठ्ठलाने खऱ्या आयुष्यातही जपली माणुसकी, निखिल चव्हाण ह्यांचा राजे क्लब ने स्वीकारले ७५ विद्यार्थ्यांचे पालकत्व*
*'लागीर झालं जी' फेम निखिल चव्हाण च्या राजे क्लब ने एक नव्हे तर तब्बल ७५ विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी उचलली, होतकरु विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा*
*गावखेड्यातील होतकरु विद्यर्थ्यांसाठी विठ्ठलचं धावून आला, निखिल चव्हाण आणि अमित पवार ह्यांची राजे क्लब ही संस्था सांभाळते ७५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व*
कलाकार अनेकदा समाजाचा आरसा म्हणून काम करतात, त्यांची मूल्ये, श्रद्धा आणि संघर्ष त्यांच्या कामातून प्रतिबिंबित करतात.एक चांगला कलाकार आपल्या सभोवतालच्या जगाचा गोंधळ दूर करू शकतो. समाजाप्रती दिलगिरी व्यक्त करत ही कलाकार मंडळी जमेल तितकं आणि जमेल त्या पद्धतीने समाजातील गरजूंसाठी मदतीस येतात. अशातच एका मराठमोळ्या आणि प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७५ विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. हा अभिनेता म्हणजे निखिल चव्हाण.
आजवर अनेक मालिका, चित्रपटांमधून निखिलने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'लागीर झालं जी' या मालिकेमुळे निखिल घराघरांत पोहोचला. 'डंका' या आगामी चित्रपटातही निखिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातही निखिल पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून समाजातील नागरिकांना आलेल्या अडचणीवेळी त्यांच्या मदतीला धावून जाताना दिसणार आहे. 'डंका'मधून खरा विठ्ठलच त्याच्या भक्तांच्या मदतीला धावून येताना पाहायला मिळणार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चित्रपटातील हा मदतीला धावून जाणारा विठ्ठल खऱ्या आयुष्यातही अनेकांच्या उपयोगी पडतो.
निखिल चव्हाण व अमित अण्णा पवार यांच्या 'राजे क्लब'च्या वतीने शेवाळवाडी आणि मांजरी परिसरातील ७५ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत हा विठ्ठल खरंच धावून आला आहे. मांजरी आणि शेवाळवाडी परिसरातील अत्यंत गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च निखिल चव्हाणच्या 'राजे क्लब' या संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वर्षभर लागणाऱ्या शालोपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले. शिवाय त्यांच्या या मदतीचा दर तीन महिन्यांनी आढावाही घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. एक कलाकार असण्याबरोबरच माणुसकी जागवत निखिलने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.