*अल्याड पल्याड टीमने मानले माध्यम प्रतिनिधींचे आभार*
July 13, 2024
0
*अल्याड पल्याड टीमने मानले माध्यम प्रतिनिधींचे आभार*
अल्याड पल्याड’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड चालू आहे. या चित्रपटाने आपली यशस्वी वाटचाल ५ व्याआठवड्यातही सुरुच ठेवली आहे. चित्रपटाचे यश साजरे करीत असताना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या टीमने एका विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी,तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी केलेल्याअमूल्य सहकार्याची दखल घेत ‘अल्याड पल्याड’ टीमने उपस्थित माध्यम प्रतिनिधींचा भेटवस्तू देत सन्मान केला.
या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात प्रसारमाध्यमांनी सिंहाचा वाटा उचलला हीआमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे एस.एम.पीप्रोडक्शन्चे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी सांगितले.
रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते शैलेश जैन,महेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील आता ‘अल्याड पल्याड २’ आपल्या भेटीला घेऊन येणारआहेत. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचा सिक्वेल ही रसिकांना मनोरंजनाचा नक्कीच आनंद देईल, असाविश्वास दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी व्यक्त केला.