Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आयुष्मान खुरानाच्या कवितेने घातला धुमाकूळ!

आयुष्मान खुरानाच्या कवितेने घातला धुमाकूळ! T20 वर्ल्ड कप विजयावर 20 मिलियन व्यूज़ मिळवणारी कविता व्हायरल बॉलीवूडचा स्टार आयुष्मान खुराना, जो आपल्या हृदयस्पर्शी कवितांसाठी प्रसिद्ध आहे, सध्या इंटरनेटवर चांगलाच गाजतोय. भारताच्या T20 वर्ल्ड कप विजयावर समर्पित त्याची कविता 20 मिलियन हून अधिक व्ह्यूज मिळवत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे! भारतात आणि जगभरातील भारतीयांसोबत ही कविता भावनिकदृष्ट्या कशी जोडली गेली याबद्दल विचारल्यावर आयुष्मान म्हणतो, ज्या रात्री भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला, त्या रात्री मी खूप वेळ झोपू शकलो नाही. हे वैयक्तिक वाटलं कारण आपलं हृदय भारतासाठी उत्कटतेने धडधडतं आणि हा विजय खूप दिवसांनी आला होता. त्यामुळे, जेव्हा दुसऱ्या दिवशी उठलो, तेव्हा मला टीमसाठी, त्यांच्या निर्धारासाठी आणि आवाजाच्या गोंधळातून बाहेर पडून देशाला सर्वोच्च गौरव मिळवण्यासाठी काहीतरी लिहायचं होतं.”
तो पुढे म्हणतो, “जे काही मी लिहिलं, ते माझ्या मनातून सरळ बाहेर आलं आणि मला आनंद आहे की, ते भारतात आणि जगभरातल्या भारतीयांमध्ये एवढं गाजलं. आपण आपल्या विजयाच्या क्षणी एकत्रित होतो आणि ते खोलवर जाणवलं.” आयुष्मान भारताच्या एकता आणि विविधतेसाठी या विजयाबद्दल अत्यंत आनंदी आहे. तो म्हणतो, “आपल्या चित्रपटसृष्टीप्रमाणेच क्रिकेटसुद्धा धर्माचा एक अद्भुत मिश्रण आहे - भारतातील विविधतेचे खरे उदाहरण आहे . हा विजय त्या विविधतेचंही एक उत्सव आहे. जेव्हा भारताने वर्ल्ड कप उचलला, तेव्हा ते अविस्मरणीय क्षण होते.” Instagram Link - https://www.instagram.com/reel/C82SV-SSBrN/?igsh=amdvOTVwOXpwbWdm

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.