Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मनारा चोप्रा ते अलाया एफ पर्यंत बॉलीवूड तारकांमध्ये रंगलीए परीकथांबाबत दिलखुलास चर्चा*

*मनारा चोप्रा ते अलाया एफ पर्यंत बॉलीवूड तारकांमध्ये रंगलीए परीकथांबाबत दिलखुलास चर्चा*
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिका- ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ अखेर टीव्हीवर प्रसारित झाली आहे. दरम्यान या मालिकेच्या निर्मात्यांनी अदिती त्रिपाठी (दीपिका) आणि अक्षित सुखिजा (चिराग) यांचा एक रोमांचक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या ‘प्रोमो’त प्रेक्षकांना दीपिकाच्या वेदना आणि तिला तिच्या सावत्र आई आणि सावत्र बहिणीकडून मिळणारी वाईट वागणूक बघायला मिळते. दीपिकाच्या अंधाऱ्या आयुष्यात चिरागमुळे प्रकाशाची तिरीप आणि प्रेम कसे येते, हेही या प्रोमोत दाखवले आहे. या परीकथेची चर्चा आता बॉलिवूडपासून गुजराती मनोरंजन उद्योगापर्यंत सर्वत्र जोर धरू लागली आहे. बॉलिवूड तारका मनारा चोप्रा आणि अलाया एफ यांनीही ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे आणि या मालिकेविषयी प्रेम व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर परीकथेबाबत त्यांनी आपली मतेही मांडली आहेत. मनारा चोप्राचा परीकथांवर विश्वास आहे आणि तिला वाटते की, ती स्वतः एक परीकथा जगतेय. तर, अलाया एफला विश्वास वाटतो की, त्याग आणि कठोर परिश्रम ही तुमची स्वप्ने साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे. दुसरीकडे, गुजराती अभिनेत्री क्रिना पाठक, जी ‘मोती बा नी नानी वहू’सारख्या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रेक्षकांना परिचित आहे आणि उर्वशी सोलंकी, जिने गुजराती चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि ‘अवजो, नही रे छुटे तारो साथ’ आणि ‘शूटआउट’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, या तारकांनी ‘दिल को तुमसे प्यार हुआ’ या मालिकेकरता खास संदेश धाडला आहे.
गुजराती अभिनेत्री क्रिना पाठकने *आपल्या संदेशात म्हटले आहे, “मी माझी परीकथा- जसे की, फाफड़ा जिलेबी आणि जगण्याचा आनंद लुटत जीवन जगत आहे. प्रेम हे नियतीचे होते, ते मेहनतीने घडवले होते आणि ते निभावायचे होते. बरोबर की नाही?”* तर उर्वशी सोलंकी म्हणते, “जोडीदार ही अशी व्यक्ती असते, जी तुम्हांला तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, तुम्हांला स्वीकारते. असे म्हणतात की, जोड्या स्वर्गात बनतात, परंतु नंतर ते नाते टिकवण्यासाठी कितीतरी अवधी लागतो. खूप छान कथा. माझे प्रिय @niilampanchal तुम्हां सर्वांचे अभिनंदन.” या ‘प्रोमो’ला प्रतिसाद देणाऱ्यांच्या यादीत, हिमांशी पाराशर (जी साहिबाची भूमिका साकारत आहे) आणि नेहा हरसोरा (जी सायलीची भूमिका साकारत आहे) या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिकेच्या काही लोकप्रिय अभिनेत्रींची नावेही समाविष्ट आहेत. ज्यांनी समाजमाध्यमांवर परीकथेविषयीचे आपले विचार मांडताना सांगितले आहे की, त्यांचा परीकथेवर आणि प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. साहिबा आणि सायली या दोघीही प्रेमावर व परीकथांवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या स्वतःच्या प्रेमकथेबाबतही त्यांना अशीच अपेक्षा आहे.
याबाबत साहिबा म्हणते, “मला वाटते की, परीकथा अस्तित्वात आहेत आणि मला माझ्या आयुष्यातही एक परीकथा घडावी, असे वाटते.” तर या संदर्भात बोलताना सायली म्हणते, “परीकथा आहेत. जेव्हा मी माझ्या प्रवासाकडे मागे वळून पाहते, तेव्हा हा प्रवास पाहिल्यानंतर मला वाटून जाते की, कदाचित मी या परीकथांचा एक भाग आहे.” 'दिल को तुमसे प्यार हुआ' या मालिकेने प्रसारमाध्यमांतील बातम्यांत स्थान प्राप्त केले आहे आणि या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर, बॉलीवूड अभिनेत्रींपासून गुजराती सिनेसृष्टीतील तारकांपर्यंत-मनारा चोप्रा, अलया एफ, क्रिना पाठक, उर्वशी सोलंकी, नेहा हरसोरा, हिमांशी पाराशर आणि तहसीन पुनेवाला अशा अनेक अभिनेत्रींनी परीकथांबाबतचे आपले मत व्यक्त केले आहे, ही चर्चा या मालिकेइतकीच रंजक आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.