एण्ड टीव्ही घेऊन येत आहे मालिका 'भीमा'
July 13, 2024
0
एण्ड टीव्ही घेऊन येत आहे मालिका 'भीमा'
~ तरूण मुलगी भीमाचा समान अधिकार मिळवण्याच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणारा सामाजिक ड्रामा ~
१९८०च्या दशकावर आधारित आणि राज खत्री प्रोडक्शन्स निर्मित एण्ड टीव्हीवरील नवीन मालिका 'भीमा' मागासवर्गीय समाजातील तरूण मुलगी 'भीमा'च्या जीवनगाथेला सादर करते. मालिकेचे कथानक सामाजिक ड्रामा आहे, जे या तरूण मुलीचे प्रयत्न आणि समान अधिकार मिळवण्याप्रती तिच्या प्रवासाला प्रकाशझोतात आणते. प्रेक्षकांना तिचा धाडसी प्रवास पाहायला मिळेल, जेथे ती तिचे कुटुंब, समाज आणि आर्थिक स्थितींमुळे उद्भवलेल्या संकटांशी सामना करते. अनेक अन्याय व भेदभावांचा सामना करत ती नीडरपणे या अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे कायदे व आदर्श कायम ठेवण्याचा भीमाच्या संकल्पामधून आव्हानांना न जुमानता तिची अविरत कटिबद्धता दिसून येते. अगदी कमी वयामध्ये ती या मिशनप्रती स्वत:ला प्रामाणिकपणे झोकून देते. पण, तिच्या या प्रयत्नांमुळे घाबरून गेलेला समाजातील उच्चभ्रू वर्ग तिच्या प्रयत्नांना मोडून काढण्यासाठी एकत्र येतो. अडथळ्यांसोबत संघर्ष गंभीर होत असताना देखील भीमाचा दृढनिश्चय कायम राहतो.
पहा मालिका 'भीमा' ६ ऑगस्ट २०२४ पासून रात्री ८.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!