*वसुवर ठाकूर घराण्याचा वारस देण्यासाठी जयश्रीचा दबाव*
July 28, 2024
0
*वसुवर ठाकूर घराण्याचा वारस देण्यासाठी जयश्रीचा दबाव*
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत बनीला त्रास देण्यासाठी जयश्रीचे प्रयत्न सुरूच आहेत पण आता त्याची तीव्रता ती वाढवते ज्यामुळे तो लवकरात लवकर बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याचा निर्णय घेईल. जयश्रीच्या प्रयत्नानंना यश मिळत आणि बनी आपला निर्णय सगळ्यांना सांगतो. इकडे लकीला कळले आहे की तो ज्या वृद्ध जोडप्याला मदत करत आहे ते त्याचे स्वतःचे आई- वडील आहेत. सुधीर आणि सुशीलाचा वसुंधराचं लग्न आणि बनीचे अस्तित्व लकीपासून लपवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. निराश बनी वसु-आकाश समोर आपली बोर्डिंग स्कूलमध्ये इच्छा बोलून दाखवतो. आकाश आणि वसुला याबद्दल शंका वाटते पण बनी त्यांना पटवून देतो. बनीचा बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याचा दिवस उजाडतो आकाश, वसु सोबत बनीला सोडायला जाणारच आहे तिथे जयश्री काहीतरी घोळ घालते ज्याने आकाशला मागे राहण्यास भाग पाडते.
घरात बनीच्या अनुपस्थितीचा सामना करण्यासाठी वसुचा संघर्ष सुरु होतो. पहिल्यांदाच आपल्या मुलापासून वसु इतकी दूर राहत असल्यानी तिचा जीव कासावीस होतो. पण जयश्रीला विजयी झाल्यासारखे वाटते आणि ती वसुला ठाकूर घराण्याचा वारस देण्यासाठी दबाव आणायला सुरुवात करते. आता *काय असेल वसुच पुढचं पाऊल? जयश्रीच्या दाबावाखाली येऊन वसु, आकाशसमोर आपलं दुःख व्यक्त करेल का? बोर्डिंग स्कूल मध्ये बनीचे काय अवस्था होत आहे?* हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा 'पुन्हा कर्तव्य आहे' सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.