आज एका ताऱ्याचा उदय झाला आहे” --- मोहम्मद दानिश
July 18, 2024
0
सुपरस्टार सिंगर 3 मध्ये मोहम्मद दानिशने शुभ सूत्रधारचे कौतुक करताना म्हटले, “आज एका ताऱ्याचा उदय झाला आहे”
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 हा लहान मुलांचा गायन रियालिटी शो ‘बारिश स्पेशल’ भागातून प्रेक्षकांवर मॉन्सूनच्या धारांची बरसात करायला येत आहे. आपल्या हृदयस्पर्शी गायनातून यातील प्रतिभावान स्पर्धक मॉन्सूनची जादू जिवंत करतील आणि तुम्हाला या मोसमाच्या सुंदर आठवणी देऊन जातील.
सिलीगुडीहून आलेल्या शुभ सूत्रधारने ‘रिमझिम गिरे सावन’ हे सदाबहार गाणे सादर करून सुरांची बरसात केली आणि सुपर जज नेहा कक्कड आणि कॅप्टन्सनी तिला दाद देताना स्टँडिंग ओव्हेशन दिले! शुभने स्वतः तयार केलेला एक नावीन्यपूर्ण व्हिडिओ तो मंचावर गात असताना पार्श्वभूमीवर दाखवण्यात आला. सगळ्यांना प्रभावित करणाऱ्या या व्हिडिओमुळे त्याचा परफॉर्मन्स आणखी खास बनून गेला.
या मंत्रमुग्ध करणाऱ्या परफॉर्मन्सबद्दल शुभचे कौतुक करताना सुपर जज नेहा कक्कड म्हणाली, “शुभ सर्वार्थाने हीरो बनला आहे. शुभ, तुला प्रत्यक्ष गाताना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच आहे. सुपरस्टार सिंगर आता समारोपाकडे वाटचाल करत आहे आणि तुझ्या गाण्याची मला खूपच आठवण येणार आहे, कारण तुझा आवाज फार सुंदर आहे. तुझा आवाज आम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातो आणि तुझ्या गाण्यात हरवून जातो. तुझ्यावर खरोखर देवाचा वरदहस्त आहे.”
कॅप्टन दानिश शुभची प्रशंसा करताना म्हणाला, “आज एका ताऱ्याचा उदय झाला आहे! तू इतका सुंदर गातोस.. मी तर त्या म्युझिक व्हिडिओमध्ये हरवून गेलो होतो. तुझे गाणे ऐकताना कान तृप्त होतात. तू आमचा भावी रॉकस्टार आहेस.”
सगळ्यांचे कौतुकाचे बोल ऐकून भारावलेला 14 वर्षांचा शुभ सुपर जज नेहा कक्कडला त्याच्यासोबत गाणे म्हणण्याची विनंती करताना दिसेल.
हे सुंदर क्षण अनुभवण्यासाठी बघत रहा, सुपरस्टार सिंगर 3 दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!