Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'बारदोवी' चित्रपटातून मिळणार थरारक अनुभव*

*'बारदोवी' चित्रपटातून मिळणार थरारक अनुभव* - *प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा ट्रेलर लाँच* - *२ ऑगस्टला देशात सर्वत्र प्रदर्शित* मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या "बारदोवी" या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली असून, कसलेले अभिनेते, गुंतवणारं कथानक असलेला हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
"बारदोवी" या आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. करण शिवाजीराव चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत "बारदोवी" या चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रवीराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत. छाया कदम यांच्यासह चित्रपटात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत. तर विक्रम पाटील यांनी कॅमेरा, अरविंद मंगल यांनी प्रोडक्शन डिजाइन आणि विकास डीगे कार्यकारी निर्माता आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर मती गुंग करणारा आहे. चित्रपटाचं चित्रीकरण आणि व्हीएफएक्स उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे कसदार कथानकाला दमदार तांत्रिक बाजू, पार्श्वसंगीताची साथ असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. म्हणूनच हा चित्रपट हिंदीतील वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. ट्रेलरमुळेच चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. *Trailer Link* https://youtu.be/r-jUhQPBJgs

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.