इंद्रायणी' मालिकेचे 100 भाग पूर्ण!
July 11, 2024
0
*'इंद्रायणी' मालिकेचे 100 भाग पूर्ण!*
कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच आता 'इंदू'च्या मनातील इच्छा पूर्ण होणार का? काय असेल तिची इच्छा याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'इंद्रायणी' मालिकेने 100 भागांचा टप्पा पार केला असून यापुढेही तिची गोष्ट अधिक प्रभावी होणार आहे. त्यामुळे यापुढेही 'इंद्रायणी'च्या या प्रवासात सहभागी होऊन आपल्या लाडक्या इंदूला अजून भरभरून प्रेम द्या. पाहा 'इंद्रायणी' दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.