Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लीला,वसुंधरा आणि पारूच्या नवीन आयुष्यात घडणार मोठा बदल

*लीला,वसुंधरा आणि पारूच्या नवीन आयुष्यात घडणार मोठा बदल* *झी मराठीचा 'लग्न सराई विशेष' भाग* झी मराठीवर सुरु असलेल्या *'लग्न सराई विशेष'* भागांमध्ये *‘पारू-आदित्य’, ‘आकाश-वसुंधरा’ आणि ‘एजे-लीला’ लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत* . ह्या तीन जोडप्याचं नातं भलेही प्रेमाच्या पायावर जोडले गेले नसेल, पण त्यांच्या समोर येणारं आयुष्य काय बदल घडवेल ते बघण्यासारखं असणार आहे. आता जरा ह्यांच्या लग्न सोहळ्यावर नजर घालूया. 'पारू आणि आदित्यच' लग्न केवळ एक जाहिरातीच्या शूटसाठी होतं. पण ही जाहिरात किर्लोस्करांची होती तर त्यांचा थाट बिलकुल ही कमी नव्हता. तर दुसरं जोडपं 'आकाश-वसूच' ज्यांच्या नात्याची सुरुवात वसुच्या मनात नसतानादेखील केवळ सासू सासऱ्यांच्या विनंती खातर, आकाशला अंधारात ठेवून केली आहे.
ह्या लग्नात संगीत पासून ते लग्नापर्यंत सर्व कार्यक्रम सुंदरपणे रचले गेले होते लाल आणि पिवळ्या रंगाच्या सहावारी नेसून, केसात लाल-पिवळे गुलाब माळून वसु नवरी रूपात सजली होती. तर आकाशने हलक्या पांढऱ्या रंगाच्या शेरवानी सोबत एक लाल रंगाचा शेला खांद्यावर ओढला होता. तिसरं आणि सर्वात भव्य लग्न सोहळा ज्याची चर्चा सर्वत्र होतं आहे ते म्हणजे एजे आणि लीलाच लग्न. इथे सगळं काही शाही होत आहे अभिराम जहागीरदारच लग्न आहे तर संपूर्ण सजावटीत भव्यता दिसून येत होती. लग्नाची सात वचने एका सुंदर रांगोळी मध्ये लिहली गेली होती. तर नवदेव आणि नवरी सोनेरी रंगांच्या पोशाखात सजले होते. लीलाच्या लुकची खास गोष्ट म्हणजे तिच्या कमरेत बांधलेला सप्तपदीचा पट्टा. लग्नात जरी काही कमी नसली तरी पण जेव्हा नवरीचा चेहरा त्या ओढलेल्या पदरामधून सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होईल हे बघण्यासारखं असेल.
*लीला, वसुंधरा आणि पारू लग्नाच्या बंधनात तर बांधले गेले आहेत. पण आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'पारू' दररोज संध्या ७:३० वा., 'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. आणि 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.