Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ !*

*निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ !* 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत रघुनाथ आणि उमाचा संघर्ष सुरूच आहे. रघुनाथ वर चोरीचा आरोप येतो. श्याम पोलिसांना सांगतो की हे पैसे मीच त्यांना दिले होते. पण माझ्या डोक्यातून गेलं. रघुनाथ खोतांबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही ही फॅक्टरीच त्यांच्यामुळे उभी आहे. हे ऐकून पोलीस दादा खोतांवर कारवाई न करता निघून जातात. शिर्केचा प्लान फसलाय. रघुनाथ एक स्वाभिमानी व्यक्ती आहे एवढं सगळं झालयावर तिथे थांबणं त्यांना ठीक वाटत नाही आणि ते तिकडून निघून जाण्याचा निर्णय घेतात. दुसरीकडे रघुनाथच्या लेकीच्या म्हणजेच निशीच्या आयुष्यात एक नवीन वादळ घोंघावतंय. निशी आणि नीरजला सगळं कुटुंब निरोप देतं. निशीची रीतसर पाठवणी होते.
जाताना निशी ओवीला आणि श्रीनुला आपलं दुभंगलेलं घर पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न करा म्हणून विनंती करते. मेघना चारुला नेमकं ह्याचं उलट सांगते कारण हे एकत्र आले तर श्रीनू तुझ्या हातून निघून जाईल. मुंबईला निशीचा सून म्हणून नव्या घरात गृहप्रवेश होतो. तिथे निशीची ओळख होते ती साहिलची बहिण सलोनी आणि बिझनेस पार्टनरची मुलगी निकिताशी. निशी माप ओलांडून घरात येणार त्या आधीच नीरज पुढे होऊन निकिताला मिठी मारतो. निशी ते पाहून हादरते. पुढे काय वाढून ठेवलंय निशीच्या आयुष्यात ? आयुष्यात आलेलं निकिता नावाच्या वादळशी कशी सामोरी जाईल निशी? पाहायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' रात्री ८:३० वा फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.