*काय आहे भुवनेश्वरीचा नवीन कट ?*
June 10, 2024
0
*काय आहे भुवनेश्वरीचा नवीन कट ?*
*'तुला शिकवीन चांगलाच धडा'* मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे आणि मालिकेला ही प्रेक्षकांचं तितकच प्रेम मिळत आहे. अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली अधिपतीला दिलेय. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे. अक्षरा आणि अधिपतीचा खरा संसार आता कुठे सुरु झालाय. त्यांच्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी आजी ठरवते की त्यांच्यासाठी काहीतरी करायचे. अधिपती-अक्षराची खोली सजवण्याची तयारी आजी सुरु करते. ही गोष्ट जेव्हा भुवनेश्वरीला कळते तिचा संताप होतो. भूवनेश्वरी त्यांना वेगळं करण्याचा नवा कट रचतेय. भुवनेश्वरी मुद्दाम दुर्गेश्वरीला त्यांची खोली जातीने लक्ष घालून सजवण्याचा आदेश देते. *काय आहे भुवनेश्वरीची नवीन प्लान? अक्षरा अधिपतीमध्ये होईल का एका नव्या नात्याची सुरुवात? रस्ताही पाहायला विसरू नका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' दररोज ८ वा फक्त आपल्या झी मराठीवर.*