Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मधुरा वेलणकर साटमला यंदाचा "मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार",

*अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला यंदाचा "मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार", सोलापूर प्रदान* *लेखिका म्हणून मधुरा वेलणकर साटमचा पहिला पुरस्कार* *"मधुरव" पुस्तकाच्या निमित्ताने अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला पुरस्कार*
चार राज्य पुरस्कारांची आणि इतर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून आपल्याला परिचित असलेल्या आणि नाट्य-चित्रपट-अभिनय शिबिरं-कार्यशाळा अशा नानाविध माध्यमांतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात घोडदौड करणाऱ्या, ३०हुन अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने अगदी सहजच लेखन क्षेत्रातही पाऊल टाकलं आणि तिचे पहिलवहिले लेखिका म्हणून असलेले ‘मधुरव' पुस्तकही अल्पावधीतच लोकप्रिय ठरल. "मधुरव" ह्या रसिक आंतरभारती प्रकाशित पुस्तकासाठी यंदाचा "मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार" सोलापूर येथे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते नुकताच अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रोख एकवीस हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
उमेद पुरस्कार कला गौरव पुरस्कार, कर्तृत्त्व आभा पुरस्कार, राणी सईबाई पुरस्कार, रोटरी लाईन्स, क्लब यंग गेस्ट अचीवर अवॉर्ड, व्ही.शांताराम पुरस्कार अशा अभिनयासाठी मिळालेल्या अनेक विविध पुरस्कारांनांतर लेखनाकरिता मिळालेल्या ह्या पुरस्काराचे मोल हे नक्कीच विशेष आणि नवीन ऊर्जा देणारे असल्याचे अभिनेत्री,लेखिका मधुरा वेलणकर साटम हिने सांगितले. तसेच सध्या माया या नवीन कादंबरीचे लेखन सुरु असल्याचे ही तिने आवर्जून नमूद केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.