Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'इंद्रायणी' मालिका उत्कंठावर्धक पोहोचली वळणावर

*'इंद्रायणी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली; संतोष जुवेकर देणार पाठीराखा बनून इंदूची साथ*
आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'इंद्रायणी' मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचली आहे. या मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसेच अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना थक्क करत आहेत.
'इंद्रायणी' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे इंदू दिग्रसकर वाड्यात राहायला गेली असून तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदूला महाराजांची काळजी लागली आहे. एका साधू बाबांनी सांगितल्या प्रमाणे इंदू व्यंकू महाराजांना वाचवण्याकरता मोठी कसोटी पार पाडेल. १० जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार. साधू बाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जाण्याचे ठरवते.
पण तिने निवडलेला हा प्रवास खूपच खडतर असणार यात काही शंका नाही. पैसे अपुरे असताना आणि कसली माहिती नसताना तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल. याशिवाय तिच्या या खडतर प्रवासात पाठीराखा म्हणून साथ देणाऱ्या व्यक्तीची भूमिका संतोष जुवेकर साकारणार आहेत . आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पाडणार आहेत, या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
'इंद्रायणी' या मालिकेतील इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास … इंदूला व्यंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल?? तिचं आराध्य दैवत असलेले श्री विठूमाऊली तिला कशी कशी साथ करतील, हे पाहायला विसरू नका…. दररोज संध्याकाळी ७ वाजता , फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.