'अंतरपाट' मधील गौतमीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
June 07, 2024
0
*'अंतरपाट' मधील गौतमीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन*
कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मी अनपट म्हणजेच आपल्या लाडक्या गौतमीचे थोड्याच दिवसांत लग्न होणार आहे. सध्या घरात लग्नाची लगबग सुरु आहे .आता पत्रिका ही आल्या असून पहिली पत्रिका श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांच्या चरणी ठेवून गौतमीने आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्याआधी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यावेळी गौतमी आणि तिच्या पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले असून ते अतिशय आनंदी आहे.
आता तुम्ही ही पाहू शकता गौतमीच्या लग्नाची तयारी 'अंतरपाट' कलर्स मराठीवर १० जूनपासून दररोज संध्याकाळी ७: ३० वाजता आणि कधीही #JioCinema वर.