Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहवरील अबोली आणि अंकुशच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट

स्टार प्रवाहवरील अबोली आणि अंकुशच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचकेची मालिकेत होणार एण्ट्री
स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचा अबोलीने घेतलेला वसा अनेकांसाठी आशेचा किरण ठरतोय. नवनव्या केसचा छडा लावत असतानाच आता अबोलीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचं नाव आहे श्रेयस सुमन मराठे. सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके श्रेयस सुमन मराठे हे पात्र साकारणार आहे. अबोलीच्या विरोधात श्रेयस केस लढणार आहे. या नव्या आव्हानाचा अबोली आणि अंकुश कसा सामना करणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. सुप्रसिद्ध अभिनेता माधव देवचके जवळपास ६ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. याआधी देवयानी आणि गोठ या मालिकेत माधवने लक्षवेधी भूमिका साकारली होती. श्रेयस सुमन मराठे ही व्यक्तिरेखा देखिल हटके असेल.
श्रेयसचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे नावासोबतच तो आईचही नाव लावतो. अतिशय हुशार, यशस्वी आणि हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणारा श्रेयस अबोली-अंकुशच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालथ घडवणार हे पहायचं असेल तर न चुकता पहा अबोली रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.