Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*एजे- लीलाच्या रिसेप्शन मध्ये काय घडले?*

*परफेक्ट हिटलरच्या इम्परफेक्ट संसाराची सुरुवात !* *एजे- लीलाच्या रिसेप्शन मध्ये काय घडले?* 'नवरी मिळे हिटलरला' मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. अभिराम आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे. नुकतंच वटपौर्णिमेला लीलाने एजेसाठी वडाच्या झाडाला १००१ प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा वाटलं की आता ह्यांचं नातं रुळावर येईल. पण एजे-लीलाच्या आयुष्यात सगळंच गोड गोड कसं असेल. पण हळूहळू एजे-लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे. दोघे ही आजीच्या सांगण्यावरून एका खोलीत राहायला तयार होतात. जे एकमेकांच्या नजरेलाही नजर देत नाहीत त्यांच्यासाठी एका खोलीत राहणे म्हणजे तारेवरची कसरत असणार. एजेला एसी शिवय जमत नाही आणि लीला बिचारी एसी मध्ये गारठून जाते.
लीलाला आहे अंधाराची भीती तर एजेला उजेडात झोपायची सवय नाही. पण ही तर फक्त सुरुवात आहे ह्यांच्या इम्परफेक्ट संसाराची. हे सर्व होत असताना एजे-लीलाच्या रिसेप्शनचा दिवस उजाडतो. लीलाला, कडक सूचना मिळालेय की मीडिया समोर काहीही बोलायचे नाही. पण जिथे लीला आहे तिथे तर जे व्हायचे नाही ते होणारच, मीडियाने लीलाला प्रश्न विचारून इतकं भांभावून सोडलंय लीलाच्या तोंडून असं काही निघत की सगळे हादरतात आणि तितक्यात एजे तिथे येतो. *लीलाच्या रिसेप्शन मध्ये खास पाहुणी बनून लीलाची मैत्रीण वसुंधरानि ही हजेरी लावली.* लीला मीडिया समोर असं का बोलते जे ऐकून हादरतात ? एजे ही वेळ सावरून नेऊ शकेल ? हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल 'नवरी मिळे हिटलरला' मध्ये दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.