Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'नवरा हाच हवा' ह्या वटपौर्णिमा विशेष गाण्याचे इंस्टाग्रामवर फक्त २ दिवसात १ मिलियन व्ह्यूज !*

*'नवरा हाच हवा' ह्या वटपौर्णिमा विशेष गाण्याचे इंस्टाग्रामवर फक्त २ दिवसात १ मिलियन व्ह्यूज !* *'तुला शिकवीन चांगलाच धडा'* मालिकेतील अक्षरा अधिपतीवर चित्रित 'नवरा हाच हवा' हे वटपौर्णिमा विशेष गाणं सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. फक्त २ दिवसात ह्या गाण्याने इंस्टाग्रामवर १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने बनवलेलं हे गाणं सध्या ट्रेंडिंग होत आहे आणि ह्या गाण्यावर रील्स सुद्धा बनत आहेत. ह्या गाण्यात अक्षरा आणि अधिपतीच्या केमिस्ट्रीची जादू पाहायला मिळतेय.
‘प्रफुल – स्वप्नील’ हे ह्या गाण्याचे संगीतकार आहेत. ह्या गणायचे बोल ‘मंदार चोळकर’ यांचे आहेत. ‘वेदा नेरुरकरने’ आपल्या मधुर आवाजात हे गाणं गायलं आहे. ह्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केलं आहे ‘अमित बैंग’ ह्यांनी. तर संकलन ‘विनायक पवार’, साऊंड आईडियास स्टुडिओ यांचं आहे. *‘तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेचं प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान आहे, आजपर्यंत चाहत्यांनी ह्या मालिकेला भरपूर प्रेम दिलं आणि यापुढेही असंच प्रेम मिळेल ह्याची आशा आहे.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.