आशूची लग्नगाठ शिवाशी बांधली जाणार!
June 06, 2024
0
*आशूची लग्नगाठ शिवाशी बांधली जाणार!*
*मनाविरुद्ध जोडलेलं हे नातं, कसा टिकाव धरणार...?*
'शिवा' मध्ये 'लग्न सराई विशेष' भाग सुरु आहे, दिव्याशी मांडवात जन्मो जन्मानंतरच्या नात्यात स्वतःला बांधून घेण्यासाठी बाशिंग बांधून आशु तयार आहे. शिवा, आपल्या मित्राच्या आणि बहिणीच्या लग्नात फक्त एक सावली बनून भाग घेत आहे. एक अशी सावली जी आशुच लग्नकार्य निर्विघ्न पार पडेल ह्याची पूर्ण तयारी करत आहे. पण नशिबाशी आज पर्यंत कोणीही लढू शकले नाही.
लग्नाचा मांडव सजला आहे , नवरदेव मांडवात नवरीची वाट पाहत आहे, पण नवरी मांडवातून गायब आहे. ऐनवेळी दिव्या चंदन बरोबर पळून जाण्याचा निर्णय घेते. काय होईल जेव्हा हे सत्य सर्वांसमोर येईल ? बिथरलेला आशुची शिवा सोबत लग्न गाठ बांधली जाणार आहे. शिवाच पाहिलं प्रेम तिला मिळणार असलं तरी हा प्रवास खडतर असणार हे नक्की. आशु-शिवा लग्नाच्या बेडीत बांधले तर गेले पण हे मनाविरुद्ध जोडलेलं नातं, कसा टिकाव धरणार? त्यासाठी पाहायला विसरू नका 'शिवा' दररोज ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.