*"संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा दुसरा धमाकेदार ट्रेलर लॉन्च!!*
June 13, 2024
0
*"संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा दुसरा धमाकेदार ट्रेलर लॉन्च!!*
*"संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील चित्रपटात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री!!*
*छगन भुजबळ यांच्या भूमिकेत अभिनेते संजय कुलकर्णी, तर दिग्दर्शक शिवाजी दोलताडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकेत!!*
*"संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील चित्रपट येतोय येत्या १४ जूनला!!*
*एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास १४ जूनला मोठ्या पडद्यावर!!*
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रदर्शित होत आहे. पण या चित्रपटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार? याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना लागून राहिली होती. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला असून छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.
शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे ,कार्तिक दोलताडे पाटील , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका मांडत आहेत. चित्रपटात त्यांचा जीवनपट केंद्रस्थानी आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाच्याच विरोधात आहेत. त्यामुळे आरक्षणासाठी आग्रही भूमिका आणि आरक्षणावरील आक्षेप, विरोध असा संघर्षही या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीजर, ट्रेलर, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. त्यांना सोशल मीडियातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. म्हणूनच "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास येत्या १४ जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
Trailer Link
https://youtu.be/8G6rMRMdJAc