करण-अर्जुन फिर लौट आये है! डबल ड्रामा, डबल मनोरंजन; गुलशन देवय्या साकारत आहे दुहेरी भूमिका,
June 07, 2024
0
करण-अर्जुन फिर लौट आये है! डबल ड्रामा, डबल मनोरंजन; गुलशन देवय्या साकारत आहे दुहेरी भूमिका,
डिस्नी+ हॉटस्टारकडून 'बॅड कॉप'चा ट्रेलर लाँच
~ फ्रीमॅण्टल इंडिया निर्मित सिरीज 'बॅड कॉप'मध्ये अनुराग कश्यप, गुलशन देवय्या, हरलीन सेठी व सौरभ सचदेव प्रमुख भूमिकेत आहेत आणि या सिरीजचे दिग्दर्शक आहेत आदित्य दत्त ~
ट्रेलर येथे पहा: XX
मुंबई, ७ जून २०२४: एक अच्छा और बुरा इन्सान, दोस्त तो नही हो सकते है, पर भाई जरूर हो सकते है! डबल धमाकाचा आनंद घेण्यास सज्ज राहा! पॉपकॉर्न खरेदी करा आणि सीटवर बसून राहा, कारण करण-अर्जुन, फिर से लौट आये है, और इस बार - डबल ड्रामा लेकर! डिस्नी+ हॉटस्टारने आपली ट्विन ड्रामा सिरीज हॉटस्टार स्पेशल्स 'बॅड कॉप'चा वर्षातील बहुप्रतिक्षित व मनोरंजनपूर्ण ट्रेलर लाँच केला आहे. फ्रीमॅण्टली इंडियाची निर्मिती, आदित्य दत्त यांचे दिग्दर्शन आणि रेन्सिल डिसिल्व्हा यांचे लेखन असलेली ही सिरीज परिपूर्ण मास एंटरटेनर आहे आणि २१ जून २०२४ पासून फक्त प्लॅटफॉर्मवर स्ट्रिमिंग पाहता येणार आहे. फ्रीमॅण्टल इंडियाने आरटीएलचा याच नावाचा मूळ जर्मन ड्रामा भारतीयांसाठी 'बॅड कॉप'मध्ये रूपांतरित केला आहे.
प्रतिभावान अभिनेता गुलशन देवय्या यांनी या सिरीजमध्ये जुळे भाऊ करण व अर्जुनची दुहेरी भूमिका साकारली आहे, जे स्वभावाने एकमेकांच्या विरूद्ध आहेत आणि स्वत:हून आपापले मार्ग निवडतात. शक्तिशाली पोलिस करण आणि चतुर चोर अर्जुन यांचे नशीब अनपेक्षितपणे एकमेकांमध्ये गुंतून जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळते. अनुराग कश्यप यांनी घातक व चतुर कझबे मामाची भूमिका साकारली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिरीजबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. हरलीन सेठीने प्रामाणिक पोलिस देविकाची भूमिका साकारली आहे. तसेच या थ्रिलरमध्ये सौरभ सचदेव आणि ऐश्वर्या सुष्मिता यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
विधिलिखित घटना घडतात आणि करण व अर्जुन त्यांच्या जीवनाला कायमची कलाटणी देणाऱ्या घटनांमध्ये अडकतात तेव्हा काय घडते?
फ्रीमॅण्टल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आराधना भोला म्हणाल्या, ''आम्हाला आमची पहिली ड्रामा वेब सिरीज 'बॅड कॉप' प्रेक्षकांना शेअर करताना आनंद होत आहे. डिस्नी+ हॉटस्टार येथील टीमसोबत सहयोगाने आम्ही लेखक रेन्सिल डिसिल्व्हापासून प्रमुख कलाकारांपर्यंत, तसेच दिग्दर्शन आदित्य दत्त यांच्यापर्यंत या आरटीएल फॉर्मेटचे लॉगलाइन शेअर केले आणि हे सर्व या रोमांचक व विलक्षण ट्विन ड्रामामध्ये भारावून गेले. रेन्सिलने आम्हाला ओरिजिनल कथानकाचे भारतीय रूपांतरण दिले, अत्यंत प्रतिभावान कलाकार गुलशन, हरलीन, अनुराग व सौरभ यांनी पात्रांमध्ये त्यांच्या वैयक्तिक अभिनयाची भर केली, तसेच त्यांच्या क्षमतांना पुढे नेले, जे फक्त सर्वोत्तम कलाकार करू शकतात. आदित्य यांनी या सिरीजमध्ये त्यांच्या व्यावसायिक व अॅक्शन कौशल्यांची भर केली. आम्ही आशा करतो की, आम्ही एकत्र ही सिरीज निर्माण करताना केलेल्या धमालीप्रमाणेच प्रेक्षक सिरीज पाहण्याचा आनंद घेतील.''
या सिरीजबाबत सांगताना दिग्दर्शन आदित्य दत्त म्हणाले, '''बॅड कॉप' ही ओरिजिनल कल्ट मसाला स्टोरी आहे, ज्यामध्ये लक्षवेधक कथानक, घातक खलनायक आणि दुहेरी भूमिकेत प्रमुख नायक आहे. मला नेहमी ट्विन ड्रामा पाहायला आवडतात, म्हणून मी रेन्सिल, आराधना आणि फ्रीमॅण्टल इंडियामध्ये टीमसोबत 'बॅड कॉप'साठी काम करत असताना आम्हाला माहित होते की ही सिरीज उत्तम ठरेल. आम्ही तळागाळापासून अॅक्शन व चेज सीक्वेन्सेस डिझाइन केले आहेत आणि आशा करतो की प्रेक्षकांना अभूतपूर्व सिरीज पाहण्याचा अनुभव मिळेल. अनुराग, गुलशन, हरलीन व सौरभ यांसारख्या कलाकारांसह आमची कथानकामध्ये वास्तविकता आणण्याची इच्छा होती. ते सर्व विविध सिनेमा स्कूलमधून आलेले कलाकार आहेत आणि या सिरीजमधील भूमिकांसाठी त्यांच्याशिवाय इतर कोण पात्र ठरू शकत नाही. प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे आणि मी आशा करतो की, ते ही सिरीज पाहण्याचा आनंद घेतील.''
सिरीज आणि त्यामधील भूमिकेबाबत सांगताना अनुराग कश्यप म्हणाले, ''कझबे माता आगळावेगळा खलनायक आहे. त्याची आभा करिष्माई आणि प्राणघातक आहे. गोरे सीन्ससाठी शूटिंग करताना माझ्या मनात काहीशी भिती व शंका होती. कझबे शक्तिशाली व कठोर आहे आणि मी या भूमिकेसाठी तयारी करण्याकरिता स्वत: निर्माण केलेल्या अनेक नकारात्मक भूमिकांमधून पैलूंचा शोध घेतला. फ्रीमॅण्टल इंडिया आणि आदित्य उत्तम सहयोगी आहेत आणि या शोने माझ्या अत्यंत विभिन्न बाजूला प्रकाशझोतात आणले आहे. मी कझबेसाठी फारशी तयारी केली नाही, खरेतर चित्रपट परिंदामधील नाना पाटेकर आणि चित्रपट हासिलमधील इरफान खान यांच्याकडून प्रेरणा घेतली. मी शूटिंग सुरू करण्यापूर्वी स्क्रिप्ट घेतो आणि संवाद लेखक मला त्यासंदर्भात मार्गदर्शन करतात. मला नकारात्मक भूमिका साकारणे काहीसे आव्हानात्मक वाटले, ज्यामुळे त्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. मी आशा करतो की, प्रेक्षक मला या नवीन अवतारामध्ये पाहण्याचा आनंद घेतील.''
गुलशन देवय्या म्हणाले, '''बॅड कॉप' रोमांचक कथा आहे, जी मनोरंजनपूर्ण आहे. स्क्रिप्टमध्ये माझे लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे मी साकारणाऱ्या भूमिका. करण व अर्जुन जुळे भाऊ आहेत, पण त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत वेगवेगळे आहेत, एक पोलिस आहे, तर दुसरा चोर. मला आनंद होत आहे की फ्रीमॅण्टल इंडिया आणि डिस्नी+ हॉटस्टारने मला ही संधी दिली, जेथे मी पुन्हा एकदा जुळ्या भावांची भूमिका साकारत आहे. करण आणि अर्जुन जुळे भाऊ असले तरी, त्यांचा जीवनाप्रती दृष्टिकोन वेगळा आहे आणि अत्यंत वेगळ्या परस्पर समस्यांचा समाना करतात. त्यांच्या नशीबामध्ये मोठ