Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"मुलगा रात्रभर घरी नाही आला आणि डोळे पाणावले"- मीरा वेलणकर

*"मुलगा रात्रभर घरी नाही आला आणि डोळे पाणावले"- मीरा वेलणकर* *सिताईची भूमिका करताना विसरून गेले की सीन मध्ये आहे- मीरा वेलणकर* आईपण साजरा करायला एका मातृ दिवसाची गरज नाही. 'शिवा' मालिकेतल्या सीताई म्हणजेच मीरा वेलणकरने आपल्या आईपणाचे आणि सेट वर आशुच्या आईची भूमिका निभावताना असं काय झालं की तिला रडू आले. ह्याचे किस्से त्यांनी सांगितले. जो पर्यंत मी आई झाले नव्हते तो पर्यंत माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअर वर होतं. मी ऍडव्हर्टाईजींग क्षेत्रात काम करत होते. म्हणतात ना आई झाल्यावर आयुष्य बदलून जातं तर त्या वाक्याचा अर्थ नाही कळायचा असा वाटायचं की बाळ झाल्यावर काही महिन्यांसाठी वेळ आणि लक्ष बाळावर राहील आणि मग काही महिन्यातनंतर सर्व पाहिल्यासारखं होईल. पण आई झाल्यावर लक्षात आलं की माझ्यामध्ये आपण हुन बदल होत आहेत, ते लहानबाळ तुमचं सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतं. आईपण शिकावं नाही लागतं ते तुमच्यामध्ये आपसूक येतं. माझा मुलगा जन्माला आला तेव्हा सुरवातीचे काही दिवस माझ्या डोक्यात हाच विचार चालू असायचा की त्यांनी खाल्लं का, त्याची अंघोळ झाली का, त्याला आता भूक लागली असेल का? ह्या सर्वामध्ये मी हे विसरून जायचे की माझी विश्रांती झाली आहे की नाही आणि हे सगळं फक्त आईपण अनुभवल्यावरच होऊ शकत. कुठली ही गोष्ट असो ती अभ्यासपूर्व करायची अशी माझी पद्धत आहे म्हणून मी गरोदर असताना प्रेग्नन्सी, पोस्ट-प्रेग्नन्सी, मुलाचं संगोपन, मुलाचा विकास ह्या सगळ्याची खूप पुस्तक वाचली होती खूप माहिती होती पण जेव्हा मी खऱ्या अर्थानी आई झाले तेव्हा कळले की ती माहिती आहे, अनुभव नाही. माझा मुलगा खूप लाजाळू आणि अंतर्मुख होता त्याला शाळेत आणि लोकांशी रमायला वेळ लागायचा आणि ह्यामुळे मी तिथे असणं अपरिहार्य असायचं, मी कधी-कधी थकून जायचे त्यावेळी मला समजले की संयम किती महत्वाचं आहे, फक्त संयमच नाही तर स्वीकृती असणे ही गरजेचं आहे. आई म्हणून माझ्या हे लक्षात आलं की माझ्या मुलाचा स्वभाव वेगळा आहे आणि मी ते स्वीकारले तेव्हा त्याच्यातला ही बदल मला दिसू लागला आता त्याच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की तो अंतर्मुख होता इतका उस्फुर्त मुलगा आहे.
आम्ही तिघी बहिणी, माझी आई शिक्षिका होती आणि ती घर आणि काम दोनी सांभाळायची ती माझी हिरो आहे. मी तिला इतकच बोलू शकते खूप खूप धन्यवाद कारण ती जे करू शकली ती एक सुपरवुमनच करू शकते. 'शिवा' मालिकेत मी आशुची आई आहे आणि त्याच आणि माझं नातं खूप पेमळ आहे. माझा मुलगा फक्त १२ वर्षाचाच आहे . 'शिवा' मालिकेच्या निम्मिताने मला कळेल की मला पुढे जाऊन कसं वागायला हवे आणि कसं नाही. एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतोय,"एकदा तुम्ही आई झालात की तुमच्यात एक प्रेमभावना असते, मग ते ऑनस्क्रीन मुलगा असो किंवा खरा मुलगा. त्यादिवशी आम्ही एक सीन करत होतो जिथे आशु रात्रभर घरी आलेला नसतो आणि आई म्हणून मी अत्यंत काळजीत असते मग अचानक तो घरी येतो मी त्याला पाहते आणि रडायलाच लागते तेव्हा माझ्या मनात हे चालू होतं की खऱ्या आयुष्यात जर माझा मुलगा घरी आला नाही तर मी काय करेन त्या विचाराने शॉट देता देता माझं डोळे पाणावले. तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाली". तेव्हा आशु आणि सिताईच्या नात्यातले गोड क्षण पाहायला विसरू नका 'शिवा' मालिकेत दररोज रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.