*सन मराठीवरील ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेची टीम म्हणतेय कितीही अडथळे आले तरी शो मस्ट गो ऑन!*
May 01, 2024
0
*सन मराठीवरील ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेची टीम म्हणतेय कितीही अडथळे आले तरी शो मस्ट गो ऑन!*
*शो मस्ट गो ऑन! सन मराठीवरील ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेच्या जिद्दीसाठी हॅट्स ऑफ...*
*प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सन मराठीची ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेची टीम म्हणतेय शो मस्ट गो ऑन!*
‘कितीही अडथळे आले तरी शो मस्ट गो ऑन’, हे असं चॅलेंजिंग स्टेटमेंट बरीच मेहनती, जिद्दी मंडळी करत असतात कारण त्यांचं त्यांच्या कामाप्रती एक कर्तव्य असण्याची, जबाबदारी असण्याची भावना त्यांच्या मनात असते. या वाक्याला सुंदर असं उदाहरण म्हणजे ‘सन मराठी’ वरील ‘मुलगी पसंत आहे’ ही मालिका आणि या मालिकेत महत्त्वाच्या
भूमिका साकारणारे मेहनती कलाकार हर्षदा खानविलकर, संग्राम समेळ आणि कल्याणी टीभे.
‘सन मराठी’ वरील ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत एपिसोड्सचे इंटरेस्टिंग ट्रॅक्स चालू आहेत आणि त्यामुळे प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडशी खिळून राहिले आहेत. एकीकडे बॅक टू बॅक शूट्स, नवीन एपिसोड्सची तयारी चालू आहे तर दुसरीकडे कलाकारांची तब्येत बिघडली आहे. आराध्याची भूमिका साकारणारी कल्याणी टीभेला टायफॉईड झालेला, श्रेयस उर्फ संग्रामला शूटिंगच्या दरम्यान पायाला दुखापत झाली असल्या कारणामुळे त्याची आता सर्जरी करण्यात येणार आहे आणि यशोधरा या खमक्या भूमिकेत दिसणा-या हर्षदा यांची तब्येत देखील बिघडली होती, सर्दी-ताप-खोकला असल्यामुळे त्यांच्यामध्ये बोलण्याची देखील ताकद नव्हती. एवढी गंभीर परिस्थिती असताना देखील तिघांनी दि शो मस्ट गो ऑन अशी सकारात्मक वृत्ती ठेवून, टीमने एकत्र येऊन या सगळ्या दु:खाला बाजूला सारुन अतिशय सकारात्मक आणि उत्साही ऊर्जेने आणि आनंदाने रोज शूटिंग करत आहेत.
‘मुलगी पसंत आहे’ ही मालिका एक कुटूंब झाली आहे आणि या कुटुंबातला एक जरी सदस्य दुखावला गेला तर संपूर्ण टीम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. कामाच्या ठिकाणी असं आपुलकीचं नातं असेल, तर कित्येक समस्यांवर मात करुन टीमवर्क म्हणून काम करु शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘मुलगी पसंत आहे’ ही मालिका.
कलाकारांच्या मेहनतीने दररोज रंजक एपिसोड घेऊन येणारी ‘मुलगी पसंत आहे’ मालिका पाहा सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त आपल्या ‘सन मराठी’ वर.