Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अर्जुन-आर्याच्या साखरपुड्यात अमोल आणि अप्पीची हजेरी

*अर्जुन-आर्याच्या साखरपुड्यात अमोल आणि अप्पीची हजेरी* अर्जुनने बाबांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी तो आर्या सोबत लग्न करायचा निर्णय घेतो. रुपाली बाबांची परिस्थिती बघून चिडलेली आहे आणि ती अर्जुनकडून त्याच्या नकळत अप्पीला घटस्फोटाचे पेपर्स पाठवते. अप्पीच्या हातात घटस्फोटाचे पेपर्स आहेत आणि ते बघून तिच्या पाया खालची जमीन सरकते. तिला अमोलचं टेन्शन येत. तर अमोल अप्पीने बाबाचे वर्णन केलंय त्यावरून एक चित्र काढतो. तो ह्यात बापू, दिप्या, गायतोंडे, अप्पी ह्या सर्वांची मदत घेतो आणि ते चित्र पूर्ण करायला लागतो. अप्पीला विनायकची परिस्थिती समजते आणि ती त्यांना जाऊन भेटते. तेव्हा रुपाली तिला विनायकने घेतलेल्या वचनाबद्दल सांगते आणि “अर्जुन आणि आर्याचा साखरपुडा होणार असल्याचं सांगते.” अप्पी तिकडून निघताना, विनायकची परिस्थिती आणि अर्जुनने विनायकला दिलेल्या वचनामुळे ती घटस्पोटाच्या पेपर्स वर सही करून पाठवते.
आर्याची आईला अर्जुनच्या पहिल्या लग्नाबद्दल कळते आणि ती अर्जुनला अप्पीसाठी आर्याला सोडून तर जाणार नाही ना? म्हणून प्रश्न करते. अर्जुन त्यांना शब्द देतो की, तो परत अप्पीशी काहीही संबंध ठेवणार नाही. इकडे अमोल त्याने काढलेले चित्र घेऊन बाबाला शोधण्यासाठी, त्याच्या मास्टरच्या म्हणजेच अर्जुनच्या पोलीस स्टेशनला जातो. तिकडे चिंचुकेला सिम्बाच अर्जुनचा मुलगा असल्याचे समजते. तर अमोल मास्टरसोबत बोलायचे म्हणतो आणि फोनवर अर्जुन त्याला साखरपुड्याला बोलावतो. अप्पी कामावरून आज अमोल मास्तरच्या साकारपुड्याला गेला असल्याचे समजल्याने तिला शंका येते ती मागच्या सगळ्या घटना आठवते आणि अर्जुन, अमोलचा मास्टर आहे ह्याची शंका तिला येते. *अर्जुनलाला कळेल का अमोलच त्याचा मुलगा असल्याचं सत्य ? अप्पी, अमोलला थांबवण्यासाठी अर्जुन-आर्याच्या साखरपुड्याला येईल का? अमोल, अर्जुनला बाबा म्हणून हाक मारू शकेल का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 'अप्पी आमची कलेक्टर' च्या ह्या आठवड्यात. तेव्हा पाहायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर' दररोज संध्या. ७ वा फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.