व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'मल्हार' येतोय ३१ मे रोजी भेटीला
May 15, 2024
0
*व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'मल्हार' येतोय ३१ मे रोजी भेटीला*
मराठी, हिंदी भाषेत होणार प्रदर्शित
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे.
‘मल्हार’चे पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल ! ही कथा गुजरात प्रदेशामधील कच्छच्या ग्रामीण भागात घडत असून तीन वेगवेगळया कथा येथे घडताना दिसणार आहेत. ज्या एकमेकांशी संबंधित आहेत. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल, याची खात्री आहे.
‘मल्हार’चे निर्माते प्रफुल पासड असून या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, हृषी सक्सेना, बालकलाकार श्रीनिवास पोकळे, विनायक पोद्दार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य आणि रवी झंकाल प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल कुंभार यांनी केले आहे.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणतात, "हा चित्रपट गावाकडील अनेक विषयांवर आधारित असून यात अनेक पात्रांचा समावेश आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी कथा आहे. मैत्री, प्रेम,विश्वास अशी भावनात्मक जोड प्रेक्षकांना यात बघायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक नवा अनुभव असेल असे म्हणायला हरकत नाही. ‘मल्हार’ला प्रेक्षक पसंती दर्शवतील याची मला खात्री आहे."