*आकाशने ठरवलेल्या पिकनिक मध्ये वसु आणि चिनू - मनु मध्ये होईल का नवीन नात्याची सुरुवात ?*
May 06, 2024
0
*आकाशने ठरवलेल्या पिकनिक मध्ये वसु आणि चिनू - मनु मध्ये होईल का नवीन नात्याची सुरुवात ?*
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत फादर्स डे च्या दिवशी आकाश वेळेवर घरी आला नाही म्हणून चिनू आणि मनु आकाश वर चिडतात. तर एकीकडे बनीला हॉस्पिटल मधून घरी आणलं जातं. आकाशचे कपडे धुवायला टाकत असताना जयश्रीला त्याच्या कपड्यातून हॉस्पिटलचा दीड लाखाच बिल सापडतं. जे पाहून ती थक्क होते. फादर्स डे च्या दिवशी आकाश मनु- चिनूला भेटत नाही पण बनीला भेटून त्याच्याकडून ग्रीटिंग घेतो हे चिनू-मनूला कळतं. दोघी आकाश वरती प्रचंड चिडतात आणि त्यांनी बनवलेलं ग्रीटिंग फाडून टाकतात. ठाकूर फॅमिली बनीला बघायला रानडेंच्या घरी आली आहे. येथे जयश्री सुधीर आणि सुशीला ला समज देते की सगळ्याच भार एकट्या आकाश वर यायला नको त्यासाठी तुम्ही काहीतरी करा आणि ह्या गोष्टीची कल्पना आकाशला येता कामा नये.
त्यासाठी सुधीर आणि सुशीला वकिलाला भेटतात आणि लग्नाची भेट म्हणून राहतं घर वसु आणि बनीच्या नावावरती करायचं ठरवतात. दुसरीकडे लकीने बिल्डरला गोडाऊन मध्ये बांधून ठेवलंय आणि त्याला टॉर्चर करतोय. विशाखा लकीला भेटायला गोडाऊन मध्ये येते तिथे तिला एक फोटो दिसतो जो वसुंधराचा आहे. इकडे आकाश, वसुला फोन करून पिकनिकला जाण्याबद्दल कल्पना देतो.
आता काय होईल जेव्हा विशाखासमोर वसुचा फोटो येईल ? वसु आणि मनु - चिनू मध्ये मैत्रीची सुरवात होईल ? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा 'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.