Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोड माझं मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोड माझं मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे मालिकेत साकारणार तेजस प्रभू ही व्यक्तिरेखा
स्टार प्रवाहच्या गोठ मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे लवकरच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत तो तेजस प्रभू उर्फ तेजा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तेजस प्रभू हा स्वातंत्र्य सूर्य या वर्तमानपत्राचे संपादक भास्कर प्रभू यांचा नातू. स्वातंत्र्यसेनानींचा वारसा लाभलेल्या आपल्या घराण्याचा तेजसला प्रचंड अभिमान आहे. प्रभूंचा पारंपरिक वाडा जपण्यासाठी तेजसची धडपड सुरु आहे. मात्र त्याच्या वहिनीला तेजसला हरवून प्रभू निवासाचा ताबा मिळवायचा आहे. प्रभू कुटुंबाची शान समजली जाणारी ही वास्तू तेजस वाचवू शकेल का? यात त्याला कुणाची साथ मिळणार? हे मालिकेतून उलगडेल.
स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेत काम करण्यासाठी समीर प्रचंड उत्सुक आहे. तेजस या व्यक्तिरेखविषयी सांगताना समीर म्हणाला, ‘तेजस ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. तो खोडकर आहे. त्याला कुणी डिवचलं तर तो आपलं म्हणणं खरं करण्यासाठी वाट्टेल ते करु शकतो. मालिकेचं नाव आणि गोष्ट खूपच भावली मला. कोणतंही नातं एकतर्फी असून चालत नाही. थोडं तुझं आणि थोडं माझं करतच नातं टिकवावं लागतं. त्यामुळे प्रत्येक वगोगटाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि पात्र या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल. शिवानी सुर्वेसोबत मी पहिल्यांदा काम करतोय. काम करताना खूप मजा येतेय. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं १७ जूनपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.