Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*रमा राघवमध्ये लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकरचा दमदार प्रवेश*

*रमा राघवमध्ये लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकरचा दमदार प्रवेश*
कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा ठरणार असून विक्रम या पात्राचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश होत आहे. राघव जगण्यामरण्याच्या सीमारेषेवर असताना हॉस्पिटलपासून एक व्यक्ति रमाला सातत्याने सुचकपणे भेटत आहे, ही व्यक्ति रमा राघव वनवासाला निघताना, समोर येणार असून या विक्रमचा भूतकाळ आणि रमाराघवचे वर्तमान याची उत्कंठावर्धक गोष्ट मालिकेत उलगडणार आहे.
लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकर याने ही भूमिका साकारली असून भेदक डोळे, करारी नजर आणि दमदार लुक यामुळे त्याचा मालिकेतला येत्या सोमवारी 6 मे रोजी होणारा प्रवेश विशेष लक्षणीय ठरणार आहे. रमा राघवच्या नात्यांच्या अग्निपरीक्षेचा प्रवास नव्या वेळेत सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर उलगडत आहे. पहा “रमा राघव”, सोम - शुक्र, रात्री 9:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर. #RamaRaghav #ColorsMarathi #RangManalaBhidnare

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.