निशी -नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव ?
May 16, 2024
0
*निशी -नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव ?*
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निशी आपल्या नवीन आयुष्यात रमायचा प्रयत्न करतेय. तर दुसरीकडे मेघनाचा चांगुलपणाचा रंग उतरायला सुरवात झाली आहे. ती स्वतःशी गाठ बांधते की निशीने काही ही केले तरी मी तिला मनापासून कधीच सून म्हणून स्विकारणार नाही. मेघना फक्त नीराजच्या हट्टापायी हे लग्न करून देते. मुंबईला जाण्याआधी ही मेघनाने निशीचा काटा काढण्याची पूर्ण तयारी केली पण ओवीमुळे तिचा प्लान फसतो. पण आता ती हे अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करणार आहे. नीरज परत येईपर्यंत ती निशिची घरातून आणि नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्नात असणार आहे. ज्याची सुरुवात मेघनाने हुशारीने सुरु केली आहे. निशी ओवीची काळजी घ्यायला जास्तीत जास्त वेळ खोत घरात असते ज्याचा राग मेघनाला आहे.
मेघना, निशीला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात यशस्वी होईल ? यासाठी बघायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' रात्री ८:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.