कलर्स मराठीचा नवीन शो 'अबीर गुलाल'चा लक्षवेधी प्रोमो रिलीज
May 03, 2024
0
*कलर्स मराठीचा नवीन शो 'अबीर गुलाल'चा लक्षवेधी प्रोमो रिलीज*
संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झाली आहे. या नवीन बदलाची सुरुवात ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे करण्यात आली.
कलर्स मराठी काही ना काही नवनवीन मनोरंजन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतच असते. नुकतीच 'सुख कळले' ही नवी मालिका रसिकजनांच्या भेटीला आली.
'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवी मालिका घेऊन आपल्यासमोर सज्ज झाली आहे. 'अबीर गुलाल', असे या नव्या मालिकेचे नाव असून काही दिवसांआधी या नव्या मालिकेचा टिझर रिलिज झाला.
त्यामध्ये आपण दोन अनोळखी मुलींचे नशीब कसे एका रात्रीत बदलले, हे पाहिले. या दोघी आता मोठ्या असून या नव्या प्रोमोमध्ये तुम्हाला त्यांची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.
प्रोमोमध्ये सावळी मुलगी एका गोऱ्या कुटुंबियांच्या घरात तर, गोरी मुलगी सावळ्या, श्रीमंत घरात दिसून येत आहे. सावळ्या मुलीचे नाव श्री तर, गोऱ्या मुलीचे नाव शुभ्रा असून शुभ्रा तिच्या आईवडिलांची लाडकी आहे पण, ती त्यांच्या वर्णामुळे त्यांच्यासोबत वाईट वागत आहे तर, दुसरीकडे श्रीच्या घरात सगळे गोरे असून तिचे वडील तिला सावळ्या रंगामुळे वाईट वागणूक देत आहेत. श्रीचा स्वभाव मनमोकळा, निरागस आणि प्रेमळ तर, शुभ्राचा रागीट स्वभाव पाहायला मिळत आहे. काय आहे श्री आणि शुभ्राच्या नशिबात? जाणून घेण्यासाठी पाहा 'अबीर गुलाल'. या मालिकेचा नवीन प्रोमो तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अथवा इंस्टग्राम किंवा फेसबुकवर पाहू शकता.
Abir Gulaal
Instagram: https://www.instagram.com/reel/C6arJHfNMju/?igsh=eHUwd3I5aXZ1Nm5r
Facebook : https://fb.watch/rNEXRYhDTn/
https://youtu.be/y7BmoJgeaa8
या मालिकेत पायल जाधव आणि गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. 'अबीर गुलाल' या मालिकेत अजून कोणती स्टारकास्ट असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून मालिकेचा टिझर पाहून अनेकांना उत्सुकता लागली आहे. मालिकेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी पाहात राहा कलर्स मराठी.