अक्षरा सरगमची अट मान्य करेल का ?*
May 07, 2024
0
*अक्षरा सरगमची अट मान्य करेल का ?*
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी आलेली सरगम अधिपतीशी जास्तच मैत्रीपूर्वक संबंध करु पाहतायेत ही गोष्ट अक्षराला खटकते. गाणं शिकवण्यासाठी मैत्री करण्याची गरज नाही, फक्त गाणं शिकवा हे अक्षरा स्पष्टपणे सरगमला सांगते. अक्षराचं हे वागणं सगळ्यांनाच कळेनासं होतं. सरगम चिडून निघून जाते त्यामुळे आता अधिपतीला गाणं कोण शिकवणार हा प्रश्न उभा राहतो. सरगम अक्षरामुळे निघून गेली असे बोल अक्षराला ऐकून घ्यावे लागतात. भुवनेश्वरी त्यातही तिचा डाव खेळते. ती सरगमला फोन करुन सांगते की जोवर अक्षरा तुझी माफी मागत नाही तोवर घरात पाऊल टाकायचं नाही. अधिपतीचं गाणं शिकणं थांबायला नको हा विचार करुन अक्षरा सरगमची माफी मागून तिला घरी गाणं शिकवायला यायला पुन्हा एकदा तयार करते. मात्र सरगम एक अट घालते की गाणं शिकवताना अक्षराने आजुबाजुला सुद्धा फिरकायचं नाही.
आता अक्षरा सरगमची ही अट मान्य करेल? पाहायला विसरू नका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.