*'रमा राघव’चा 400 भागांचा टप्पा पार, प्रेक्षकांचे मिळाले भरभरून प्रेम*
May 17, 2024
0
*'रमा राघव’चा 400 भागांचा टप्पा पार, प्रेक्षकांचे मिळाले भरभरून प्रेम*
कलर्स मराठीवरील 'रमा -राघव' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षकवर्ग या सगळ्यांवर भरभरून प्रेम करत आहेत. याच प्रेमामुळेच आज ‘रमा -राघव ’ या मालिकेने 400 भागांचा टप्पा गाठला आहे. 'रमा- राघव'च्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून उल्हासीतपणे हा दिवस साजरा केला .
या मालिकेतील रमा आणि राघव यांच्यावर प्रेक्षकांनी कायमच प्रेम केले. कधी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, तर कधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोघांवर अनेक संकटेही आली, मात्र त्या प्रत्येक संकटावर त्यांनी एकमेकांना साथ देत मात केली. प्रत्येक वेळी रमा राघवच्या मागे खंबीरपणे उभी राहिली.
‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा होता. त्यांच्या आयुष्यात अद्वैत दादरकर आणि वीणा जगताप या दोन नवीन पात्रांचा प्रवेश झाला आहे. रमा राघवचा सुरू झालेला हा वनवास आणि या पार्श्वभूमीवर या दोघांमुळे अजून कोणते आणि काय होईल ट्विस्ट निर्माण होईल हे पाहाणे खूप मनोरंजनात्मक ठरेल.
रमा आणि राघवच्या आयुष्यात आणखी काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहा 'रमा-राघव' , सोम – शुक्र, रात्री ९:३० वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.