Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये उत्साहात साजरा होणार गुढीपाडव्याचा सण

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये उत्साहात साजरा होणार गुढीपाडव्याचा सण
ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, अबोली, घरोघरी मातीच्या चुली, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेत पाडव्याचा गोडवा वसंताची पहाट घेऊन आली नवचैत्यनाचा गोडवा… समृद्धीची गुढी उभारु आला चैत्र पाडवा…
मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, अबोली, घरोघरी मातीच्या चुली, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी मधील अद्वैत-कला आणि प्रेमाची गोष्ट मधील मुक्ता सागरचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने दोन्ही जोड्यांसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे.
घरोघरी मातीच्या चुलीमध्ये १५ वर्षांनंतर रणदिवे आणि विखे-पाटील कुटुंब एकत्र गुढी उभारणार आहेत. सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सयाजीरावांनी एकत्र गुढी उभारण्यास सहमती दिली आहे. पाडव्याच्या गोडव्याप्रमाणे दोन्ही कुटुंबांमधला नात्याचा गोडवाही वाढेल का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.
सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शालिनी आणि नित्या पहिल्यांदा एकमेकींसमोर येणार आहेत. शालिनीच्या पापांचा घडा आता भरलाय. त्यामुळे हा गुढीपाडवा शालिनीसाठी नवा धमाका घेऊन येणार आहे.
ठरलं तर मग आणि अबोली मालिकेतही कलाकारांनी जल्लोषात गुढी उभारली आहे. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.