Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित 'धर्मा- दि एआय स्टोरी' लवकरच...

*आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित 'धर्मा- दि एआय स्टोरी' लवकरच...*
एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा 'धर्मा- दि एआय स्टोरी' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित 'धर्मा- दि एआय स्टोरी'चे पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात प्रमुख भूमिकेत दिसतील. आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी आपण फक्त सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय थेट आपल्याला मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने 'धर्मा- दि एआय स्टोरी' विषयीची उत्सुकता आता वाढलेली दिसत आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात," मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विषय नवीन असून यामध्ये तुम्हाला अनेक नवीन गोष्टी दिसतील. हा विषय एआयवर आधारित आहे. कसा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या बापाची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यात ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येईल.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.