प्रज्ञाशक्ती स्पर्धेत अक्षरा आणि भुवनेश्वरीच्या नात्यामध्ये बदल होणार?*
April 15, 2024
0
*प्रज्ञाशक्ती स्पर्धेत अक्षरा आणि भुवनेश्वरीच्या नात्यामध्ये बदल होणार?*
'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत प्रज्ञाशक्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दरवर्षी भुवनेश्वरी ह्या स्पर्धेचा पहिला क्रमांक पटकावते. ह्यावर्षी ती मुद्दाम स्वत: भाग न घेता अक्षराला स्पर्धेत भाग घेण्यासाठी उद्युक्त करते. भुवनेश्वरला, अक्षराला हरताना पाहायचं आहे ज्यासाठी ती हा कट रचते. अक्षराची प्रतिस्पर्धी म्हणून ती चंचलाला ह्या स्पर्धेत उभं करते. ह्या स्पर्धेत अक्षराला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातायत. आता हा सर्व खडतर प्रवास पार करुन अक्षरा ह्या स्पर्धेत विजेती होईल? भुवनेश्वरीला स्वतःच्या हाताने हाताने अक्षराला बक्षीस द्यावं लागेल? ह्याच समारंभात चंचलाच्या सांगण्यावरुन काही बायका भुवनेश्वरीचे वाभाडे काढतात ज्याने भुवनेश्वरी हादरते. अक्षरा त्या बायकांना सडेतोड उत्तर देते. हे सगळं बघून भुवनेश्वरीमध्ये काही बदल घडेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' दररोज रात्री ८ वा. फक्त झी मराठीवर.