Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मुंबई लोकल मध्ये वसुंधराचे चाहते !*

*मुंबई लोकल मध्ये वसुंधराचे चाहते !* 'पुन्हा कर्तव्य आहे' ह्या मालिकेत सध्या वसुंधराची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नायिका अक्षया हिंदाळकर हिच्याशी संवाद साधताना अक्षयाने अभिनयाच्या आपल्या प्रवास बद्दल सांगितले. "अगदी शाळेत असल्यापासून माझ्या आई ची खूप इच्छा होती की मी ह्या क्षेत्रात काही तरी करावे. तेव्हा माझी आई वृत्तपत्रात ज्या जाहिराती यायच्या की बालकलाकार हवे आहेत त्या पाहून मग तिथे आम्ही जायचो. पण नंतर अभ्यासमुळे ते मागे पडलं. मग दहावी झाल्यावर मी एका थिएटर ग्रुप मध्ये सहभागी झाले. माझे गुरु मिलिंद पेडणेकर ज्यांच्याकडे मी ६ वर्ष शिकले. नाटकानंतर एक ३-४ महिन्याच्या कठीण काळा नंतर मला एक मालिका मिळाली. माझा स्ट्रगलचा काळ खूप कमी होता पण तो प्रवास आज ही आठवला तरी खूप सुख देऊन जातो. मला कित्येक वर्षापासून झी मराठी वर काम करायचे होते. मी इतकं मॅनिफेस्ट केले की अखेरीस माझी इच्छा 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली . मी खूप खुश आहे वसुंधराची भूमिका माझ्यापर्यंत काहीशी अशी आली, मी ह्या आधी ह्याच निर्मिती संस्थेची एक मालिका केली होती. भक्ती मॅडमने मला विचारले की आम्ही एक मालिका आणतोय तुझी इच्छा आहे का त्यात प्रमुख भूमिकेत काम करण्याची. माझ्यानंतर ही खूप ऑडिशन्स झाल्या, जेव्हा मला कळले की इतक्या जणींमधून माझी निवड झाली आहे याचा मला प्रचंड आनंद झाला. जेव्हा माझ्या ऑडिशन्स चालू होत्या मी थोडी शाशंक होते की मी माझ्याहुन ७-८ वर्ष मोठ्या वयाच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन? पण सर्वांचा माझ्यावर १०० टक्के विश्वास होता की मी हे करू शकेन.
मालिकेसाठी लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. मला एक गोष्ट सांगावीशी वाटतेय की माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती झी मराठीवर काम करण्याची आणि ते फायनली जुळून आलं. मी ह्या आधी ही इतर मालिकांमध्ये काम केलंय. पण झी मराठीचा रिच इतका आहे की 'पुन्हा कर्तव्य आहे' चा पहिला प्रोमो आला आणि लोकं मला ओळखायला लागली. एक किस्सा सांगते, मी नवी मुंबई मध्ये राहते. ट्रॅफिक अव्हॉइड करण्यासाठी ट्रेनचा प्रवास करत होते आणि मी भूक लागली म्हणून काहीतरी खायला मास्क काढला आणि माझ्यासमोर ज्या बायका होत्या त्या सर्वानी मला एकत्र ओळखल तो माझ्यासाठी इतका भारी मोमेन्ट होता, त्यांनी मालिकेच्या प्रोमोची प्रशंसा तर केलीच आणि मला विचारले की तुम्हीच आहातना 'पुन्हा कर्तव्य आहे' च्या प्रोमो मध्ये. मी इतकं काम केले पण कोणीही अशी ओळख दिली नाही जी झी मराठीच्या ह्या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने दिली. प्रेक्षकांकडून असा प्रतिसाद मिळत आहे तेव्हा काम करण्याची ऊर्जा ही अजून वाढली आहे.” तेव्हा पाहायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.