Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झी मराठीवरील मालिकांमध्ये गुढीपाडवा जल्लोष

*झी मराठीवरील मालिकांमध्ये गुढीपाडवा जल्लोष* *गुडी पाडवा सणाच्या आठवड्यात मालिकां मध्ये गुडी उभारून मराठी नव वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे.*
सर्वात पहिले *‘शिवा’* मालिकेत गुढीपाडवा कसा साजरा केला जाणार आहे हे जाणून घेऊया. एका लहान मुलाला वाचवताना शिवाच्या हाताला लागत, हाताला लागल्यामुळे रामभाऊ तिला घरी यायला सांगतात. शिवाला घरी पाहून आशु शॉक होतो. तर दुसरीकडे आशु गुढी उभारत असताना त्याच्या हातून गुढी सुटते आणि नेमकी त्याचवेळेस शिवा ती सांभाळते. त्यामुळे योगायोगाने आशु आणि शिवाच्या हातून गुढी उभारली जाणार. ही नव्या नात्याची सुरुवात तर नसेल.
*'तुला शिकवीन चांगलाच धडा'* मध्ये अक्षरा फुलपगारे बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार करते. त्या आधीच भुवनेश्वरी अक्षराची ही तक्रार खोटी ठरवत फुलपगारे सरांना समोर उभं करत तिचा आरोप खोटा ठरवते. त्यामुळे अक्षराला भुवनेश्वरीची माफी मागावी लागते . फॅक्टरी मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कामगार आग्रह करतात की गुढी अक्षराच्या हातून उभारली जावी. हे कळल्यावर भुवनेश्वरीला राग येतो. ह्या वर्षी अक्षरा गुढी उभारून कामगारांना भेट म्हणून पुस्तकं देणार आहे.
*'पारू'* ह्या मालिकेत नेमकं पारू बाहेर गेली असताना क्लायंट ब्रँड अम्बॅसॅडर बरोबरच्या फोटोजची फोटोसची मागणी होते. अखेर पारूला शोधून आणला जातं. पारू घाबरलेल्या अवस्थेत फोटो शूटसाठी तयार होते. नेमका हा दिवस आहे पाडव्याचा. पारूचं अहिल्यादेवीच्या वेशात फोटोशूट होतं आणि त्याचवेळी तिच्या हातून गुढीची पूजा पण पार पडते.
*'अप्पी आमची कलेक्टर'* मालिकेत अप्पीला विश्वास बसतो की, रुपालीपेक्षा अमोलची व्यवस्थित काळजी आणि संभाळ कोणीच करू शकत नाही. तेव्हा ती रूपालीला अमोल हा तुमचा पण मुलगा असल्याचे म्हणते. अमोलला आपण दोघी मिळून सांभाळू असे सांगते. हे बघून घरचे खुश होतात आणि अर्जुन-अप्पी व स्वप्निल-रुपाली अमोलचे आईबाबा आणि मोठ्ठे आईबाबा म्हणून अमोलला सांभाळायचे ठरवतात आणि पूर्ण परिवार मिळून गुढी पाडव्याचा सण साजरा करतात. अप्पी आणि रुपाली दोघी मिळून अमोलची काळजी घेतात. त्याला अंघोळ वगेरे घालून तयार करतात आणि मग अर्जुन आणि अप्पी, स्वप्निल-रुपाली व सुजय पियु गुढी उभारतात.
*'सारं काही तिच्यासाठी'* मध्ये निशी- नीरजचा साकारपुडा शुभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका आपल्या आवडत्या मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.