तरुणाईचं हार्टबीट वाढवावयाला शैलेश राठोडचं 'हार्टबीट वाढणार हाय' गाणं सज्ज*
April 24, 2024
0
*तरुणाईचं हार्टबीट वाढवावयाला शैलेश राठोडचं 'हार्टबीट वाढणार हाय' गाणं सज्ज*
*शिवाली परब व विशाल राठोड अभिनीत 'हार्टबीट वाढणार हाय' गाण्याची तरुणाईला भुरळ*
सध्या एकामागोमाग एक रोमँटिक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सध्या सोशल मीडियावरील रीलमुळे ही गाणी ट्रेंडिंगमध्ये आलेली पाहायला मिळत आहेत. अशातच आता यंदाच्या उन्हाळयात हार्टबीट वाढवायला 'हार्टबीट वाढणार हाय' हे नवंकोरं रोमँटिक गाणं सध्या तरुणाईला भुरळ घालत आहे. दोन तरुण जोडप्यांमधील प्रेमळ संवाद या गाण्यातून पाहायला मिळत आहे. यावेळी रोमँटिक गाण्यासह या गाण्यात तरुणाईचं बालिश प्रेम पाहणं रंजक ठरतंय. हे हार्टबीट वाढवणारं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या गाण्याला चाहतेमंडळी भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत.
अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता विशाल राठोड या गाण्यात स्क्रीन शेअर करताना दिसले. 'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्यात शिवाली व विशालचा नटखट अंदाज साऱ्यांना अधिक भावला असून हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकू येत आहे. शैलेश राठोडच्या या 'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्याच्या निर्मितीची धुरा शैलेश राठोडने उत्तमरीत्या निभावली आहे. या नव्या कोऱ्या गाण्याने आता एन्ट्री केली असून हे गाणं ही प्रेक्षकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. या गाण्याच्या दिग्दर्शनाची बाजू अभिजीत दाणी यांनी सांभाळली आहे. तर या रोमँटिक गाण्याला सुमधुर स्वरात शैलेश राठोडने स्वरबद्ध केलं आहे. इतकंच नव्हेतर या गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची आणि संवादाची धुरा शैलेशने पेलवली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब हिने आजवर तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने साऱ्यांची मनं जिंकली. आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे.