“ये काली काली आंखेच्या सिक्वेलसह हे इंडस्ट्रीतील माझे सर्वात मोठे वर्ष असेल!” ताहिर राज भसीन.
April 24, 2024
0
“ये काली काली आंखेच्या सिक्वेलसह हे इंडस्ट्रीतील माझे सर्वात मोठे वर्ष असेल!” ताहिर राज भसीन.
नेटफ्लिक्सच्या हिट सीरीज ये काली काली आंखे मध्ये मुख्य भूमिकेसाठी ओळखला जाणारा
अभिनेता ताहिर राज भसीन या वर्षी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी आपला प्रवास आणि वर्षानुवर्षे मिळालेले प्रेम यावर चिंतन केले.
त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी आणि पडद्यावरील जबरदस्त प्रेजेंससाठी ओळखला जाणारा, ताहिर एक अभिनेता म्हणून उदयास आला आहे जो तीव्र आणि ग्रे शेड अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारू शकतो. वैविध्यपूर्ण पात्रांमध्ये जिव टाकण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला जगभरातील प्रेक्षकांकडून आणि समीक्षकां कडून प्रशंसा मिळाली आहे.
ताहिरने आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, “ये काली काली आंखेच्या सिक्वेलसह हे माझे इंडस्ट्रीतील सर्वात मोठे वर्ष असेल! त्यामुळे, या वाढदिवसासाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. नेटफ्लिक्सवरील माझ्या सुपरहिट सीरीजचा सिक्वेल असलेल्या माझ्यासाठी असा एक मोठा प्रोजेक्ट करणे हा वाढदिवस माझ्यासाठी खरोखरच रोमांचित करणारा आहे.”
तो पुढे म्हणाला, “मी ये काली काली आंखेचे शूटिंग करत आहे आणि मला सर्जनशीलतेने खूप समाधान वाटत आहे. मी एक असा अभिनेता आहे ज्याला पडद्यावर सतत स्वत:ला नव्याने आविष्कृत करायचे आहे आणि मी धन्य आहे की त्या नव्या शोधांना इंडस्ट्री, मीडिया तसेच प्रेक्षकांनी पसंत केले आणि त्यांचे कौतुक केले. ये काली काली आंखे हा एक प्रोजेक्ट आहे जो मला आजही प्रेम देत आहे. माझ्या सोशल मीडियावर या मालिकेबद्दल प्रश्नांचा भडीमार होत असतो. प्रेम आणि अपेक्षा स्पष्ट आहे. ”
ताहिर पुढे म्हणतो, “लोक मला माझ्या वाढदिवसानिमित्त ये काली काली आंखेंमधून काहीतरी नविन अपडेट देण्यासाठी आहेत!ह्या वरुण त्या सीरीज ची अविश्वसनीय यशोगाथा दर्शवते.
ताहिरने त्याच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड ओलांडला असताना, त्याने एक उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आणि प्रेक्षकांना त्याच्या कलेने भुरळ घालण्याचा निर्धार केला आहे. ताहिर आता नेटफ्लिक्सच्या 'ये काली काली आँखे' या हिट सीरीजच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.