निशी- नीरजच्या साखरपुडयात, फुलत आहे ओवी आणि श्रीनूच प्रेम !*
April 12, 2024
0
*निशी- नीरजच्या साखरपुडयात, फुलत आहे ओवी आणि श्रीनूच प्रेम !*
'सारं काही तिच्यासाठी' मध्ये निशीच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे आणि मेघनाने खोत परिवाराचं आणि संपूर्ण गावाचं मन जिंकण्याची तयारी केली आहे आणि ती मेघना, मंजूची मद्दत घेऊन मान पानाच्या साड्या घेणार आहे मंजूला तिच्या मनासारखी साडी घ्यायला मिळेल म्हणून मंजू अतिशय खुश आहे.
दुसरीकडे ओवी आणि श्रीनू उत्साहाने साखरपुड्याच्या तयारीला लागलेत. त्या दरम्यान ह्या दोघांमध्ये प्रेम आणखी बहरताना दिसतंय. साखरपुड्याचा दिवशी सगळं घर सजवल गेलंय आणि सगळे खूप आनंदात आहेत. कांताच्या समजावण्यावरून लाली पण सगळ्यात भाग घेतेय. घरात पाहुण्याची वर्दळ आहे, आणि त्यांचा पाहुणचार करताना नीरजची आई मेघना पुढाकार घेतेय. अगदी आलेल्या पाहुण्यांना पाणी देण्यापासून ती सगळी कामं करतेय. हे सगळं पाहून गावातल्या बायका पण आपसात चर्चा करू लागतात. ही मुलाची आई खूप श्रीमंत असून ही बघा अजिबात गर्व नाहीये. नाहीतर वरमाय म्हटल्यावर किती ताठा दाखवतात काही बायका. अश्या उत्साहात साखरपुडा समारंभची सुरवात होतेय.
तेव्हा निशी-नीरजच्या साखरपुडा समारंभात सहभागी व्हायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' रात्री ८:३० वा. फक्त झी मराठीवर.