आदित्यकडून पारूला साडी भेट !
April 02, 2024
0
*आदित्यकडून पारूला साडी भेट !*
'पारू' ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. मालिकेत रोज काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे, मालिकेत मारुतीने पारूच्या लग्नाची तयारी चालू केली आहे. दुसरीकडे प्रीतमच्या साखरपुड्याची तयारी ही जोरात सुरु आहे. आता लग्न घर म्हटलं की अनेक कामे आणि जबाबदाऱ्या त्यातली एक मोठी जबाबदारी म्हणजे वर आणि वधूची खरेदी. तर संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब साडी खरेदीसाठी आणि बाकी खरेदीसाठी बाहेर आहे. तिथे दुकानात सुंदर-सुंदर साड्या पाहून आदित्यच्या डोक्यात पारूच्या विचार येतो आणि तो पारूसाठी एक साडी विकत घेतो. किर्लोस्करांकडे लग्नासोबत गुढी पाडव्याची लगबग सुरु आहे, त्यातच आदित्यला कुणकुण लागते की पारूचा होणारा नवरा हा बरा माणूस नाही. म्हणून त्यांनी ठरवले आहे की पारूची ह्यातुन सुटका करायची. इकडे प्रीतमची भेट एका मुलीशी होते आणि बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो.
आता काय होईल जेव्हा अहिल्याला आदित्यच्या प्लॅन बद्दल कळेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा 'पारू' दररोज ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.